Search This Blog

Wednesday 14 September 2022

12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

 12 वी विज्ञान शाखेतील प्रवेशित विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करावे

Ø  30 सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूर, दि. 14 सप्टेंबर शैक्षणिक सत्र 2022-23 मध्ये इयत्ता 12 वी विज्ञान शाखेस प्रवेशित असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे परिपूर्ण भरलेला अर्ज जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, चंद्रपूर येथे दि. 30 सप्टेंबर 2022 सादर करावा.

         दि. 30 सप्टेंबर 2022 पर्यंत प्रकरणे स्वीकारणे, 1 ते 15 ऑक्टोबरपर्यंत प्रकरणे तपासून वैध प्रकरणे अर्जदाराचे ई-मेलवर पाठविणे व अपूर्ण अर्जांची त्रुटीपूर्तता करणे. दि. 15 ऑक्टोबर नंतर दर आठवड्यात तालुकानिहाय वैध प्रकरणांचे जात वैधता प्रमाणपत्र वितरण व अपूर्ण अर्जांची त्रुटी पूर्तता करण्यात येईल. तत्पूर्वी अर्जदाराने या कार्यालयात जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज शासकीय सुट्टीचे दिवस वगळून दाखल करणे आवश्यक आहे. तसेच प्रवेशित विद्यार्थ्यांची यादी प्राचार्यांच्या स्वाक्षरी व शिक्क्यानिशी कार्यालयाच्या vchandrapur@gmail.com या ई-मेल आयडीवर सादर करावी.

          तरी, संबंधित विद्यार्थ्यांनी आपले आवश्यक दस्तऐवज सादर करून जात प्रमाणपत्र पडताळणी तात्काळ करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त विजय वाकुलकर यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment