Search This Blog

Wednesday 28 September 2022

विद्यार्थ्यांना नशा मुक्ती विषयावर मार्गदर्शन


विद्यार्थ्यांना नशा मुक्ती विषयावर मार्गदर्शन

      चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे आयुक्त प्रशांत नारनवरे यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येथे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण अमोल यावलीकर यांच्या वतीने नशा मुक्ती अभियान विषयावर भवानजी भाई चव्हाण हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर येथे मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

          विद्यार्थ्यांनी नशा, मादक पदार्थ, अंमली पदार्थ, तंबाखू यापासून दूर रहावे व सु्‌द्दढ आरोग्य जगावे यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भवानजीभाई चव्हाण महाविद्यालयाचे प्राचार्य सी.डी. तन्नीरवार, प्रमुख मार्गदर्शक म्हणून नशा मुक्ती केंद्राचे सहारे व डॉ. समता मडावी यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. या वेळी मंचावर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निरीक्षक मनिषा तन्नीरवार, आसेगावकर, सोंडवल, गणेश खोटे उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिकेत दुर्गे यांनी केले. यावेळी समाजकार्य महाविद्यालयाचे  विद्यार्थी  युवराज बांबोळे, विशाल पवार आदी उपस्थित होते.

०००००

No comments:

Post a Comment