Search This Blog

Friday 16 September 2022

मोफत प्रिकॉशन डोजसाठी उरले केवळ 14 दिवस


 

मोफत प्रिकॉशन डोजसाठी उरले केवळ 14 दिवस

Ø नागरिकांनी त्वरीत डोज घेण्याचे जिल्हाधिका-यांचे आवाहन

 चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पार्श्वभुमीवर केंद्र सरकारच्या सुचनेनुसार ‘कोविड व्हॅक्सिन अमृत महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. 15 जुलै ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीमध्ये नागरिकांना मोफत प्रिकॉशन डोज देण्यात येत आहे. या मोफत डोजचे केवळ 14 दिवस आता शिल्लक राहिले आहे. त्यांनतर मात्र नागरिकांना खाजगी रुग्णालयात 400 रुपये देऊन प्रिकॉशन डोज घ्यावा लागेल. त्यामुळे जिल्ह्यातील पात्र नागरिकांनी शासकीय संस्थेतून त्वरीत मोफत प्रिकॉशन डोज घेऊन स्वत:ला सुरक्षित करावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे. 

प्रिकॉशन डोजकरीता 18 वर्षांवरील नागरिकांनी त्यांच्या कोविड लसीच्या दुस-या डोजनंतर 6 महिने किंवा 26 आठवड्यांचा कालावधी पूर्ण केलेला असावा. जिल्ह्यात प्रिकॉशन डोजकरीता पात्र लाभार्थ्यांची संख्या 13 लक्ष 73 हजार 192 आहे. यापैकी आतापर्यंत 1 लक्ष 79 हजार 162 लाभार्थ्यांनी प्रिकॉशन डोज घेतला असून ही टक्केवारी 13.05 आहे. सद्यस्थितीत 11 लक्ष 94 हजार 30 नागरिकांचा प्रिकॉशन डोज बाकी आहे.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध आहे. मात्र सद्यस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे नागरिक बिनधास्त झाले आहे. कोरोनाचे दीर्घकालीन परिणाम लक्षात घेता प्रिकॉशन डोज घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र प्रिकॉशन डोजबाबत नागरिकांचा निष्काळजीपणा निदर्शनास येत आहे. त्यामुळे नागरिकांनी स्वत:ला व कुटुंबाला सुरक्षित करण्यासाठी नजीकच्या शासकीय संस्थेत जाऊन प्रिकॉशन डोज घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

जिल्ह्यात कोविड लसीकरणाचे एकूण पात्र लाभार्थी 16 लक्ष 41 हजार 830 आहे. यापैकी 15 लक्ष 85 हजार 580 जणांनी पहिला डोज (96.57 टक्के) तर दुसरा डोज 13 लक्ष 73 हजार 192 जणांनी (83.64 टक्के) घेतला आहे. 12 ते 14 वयोगटातील पात्र लाभार्थी 71746 असून, पहिला डोज 64665 (90.13 टक्के), दुसरा डोज 42018 जणांनी (58.56 टक्के) घेतला आहे. 15 ते 18 वयोगटातील पात्र लाभार्थी 1 लक्ष 9 हजार 190 आहे. यापैकी पहिला डोज 77422 (70.95 टक्के), तर दुसरा डोज 54221 जणांनी (48.66 टक्के) घेतला आहे.

०००००००

No comments:

Post a Comment