Search This Blog

Wednesday, 14 September 2022

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान


 एकात्मिक फलोत्पादन विकास अभिया

Ø  शेतकऱ्यांकडून सामूहिक शेततळे घटकासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज आमंत्रित

            चंद्रपूर, दि. 14 सप्टेंबर : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानातंर्गत सामूहिक शेततळे हा घटक फलोत्पादन पिकांसाठी संरक्षित सिंचनाची सुविधा व दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकाच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करणे या उद्देशाने 100 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे.

            या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पिके असणे आवश्यक आहे. पात्र शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय अनुदान देय राहील. यामध्ये, 34×34×4.70 आकारमान(मी.) व फलोत्पादन क्षेत्र(हे.) 2 ते 5 हेक्‍टर किंवा त्यापेक्षा जास्त असल्यास 2 लक्ष 39 हजार रु. इतके अनुदान देय राहील. तर 24×24×4.00 आकारमान(मी.) व फलोत्पादन क्षेत्र(हे.) 1 ते 2 हेक्टर असल्यास 1 लक्ष 75 हजार रु. इतके अनुदान देय राहील.

            तरी,शेतकऱ्यांनी या घटकाचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर सिंचन सुविधा घटकाखाली अर्ज करावेत.  तसेच योजनेच्या अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.


०००००

No comments:

Post a Comment