सामाजिक न्याय भवन येथे शिष्यवृत्तीबाबत जिल्ह्यातील सर्व प्राचार्यांची आढावा बैठक
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा अंतर्गत डॉ. बाबसाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन चंद्रपूर येथे सहाय्यक आयक्त, समाजकल्याण अमोल यावलीकर यांच्या वतीने सेवा पंधरवाडा निमित्त चंद्रपूर जिल्हयातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्यांची शैक्षणीक सत्र २०२२-२३ बाबत भारत सरकार शिष्यवृत्तीची आढावा बैठक घेण्यात आली.
सदर बैठकीत चंद्रपूर जिल्हयातील विविध महाविद्यालयातील प्राचार्य आणि सबंधित कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील शिष्यवृत्तीसबंधी अडचणीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सदर बैठकीत या कार्यालयातील सहाय्यक लेखाधिकारी राजेंद्र बुर्लावार, समाज कल्याण निरीक्षक मनोज माकोडे, श्री. बन्सोड, श्री. कांबळे उपस्थित होते.
०००००००
No comments:
Post a Comment