Search This Blog

Saturday 17 September 2022

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शीघ्र कृती दलामार्फत 1542 गोवंशीय जनावरांचे लसीकरण

 लम्पी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शीघ्र कृती दलामार्फत 1542 गोवंशीय जनावरांचे लसीकरण

Ø  लम्पीच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज

चंद्रपूरदि. 17 सप्टेंबर: महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यात सद्यस्थितीत गोवंशीय जनावरांवर लम्पी स्कीन डिसीजचा प्रादुर्भाव निदर्शनास आलेला आहे. सदर रोग हा विषाणूजन्य असून जनावरांच्या अंगावर 10 ते 20 मी.मी. व्यासाच्या गाठीभरपूर तापडोळ्यातून व नाकातून चिकट स्त्रावचारा पाणी कमी खाणेदूध उत्पादनात घट अशी लक्षणे दिसतात.

चंद्रपूर जिल्ह्यातील मौजा शेणगाव येथे 15 सप्टेंबर रोजी लंम्पी रोगाचे 5 गोवंशीय जनावरांमध्ये लागण झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या आदेशान्वये मौजा शेणगाव येथे लम्पी स्कीन डिसीज बाधित क्षेत्र व रोग प्रादुर्भावाच्या ठिकाणापासून 5 किलोमीटर त्रिजेचा परिसर सतर्कता क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे.

सदर सतर्कता क्षेत्रात येणाऱ्या चंद्रपूर तालुक्यातील पांढरकवडावढाघुग्गूसम्हातारदेवीसोनेगाव व अंतुर्ला तर भद्रावती तालुक्यातील मुरसा या सात गावात व बाधित झालेला शेणगाव अशा एकूण 8 गावांमध्ये शीघ्रकृती दलामार्फत 16 सप्टेंबर रोजी एकूण 1542 गोवंशीय जनावरांना लम्पी रोगाचे लसीकरण करण्यात आले. तसेच बाधित जनावरांचे रोगनिदान करण्याकरिता रक्तजल नमुने घेऊन औषधोपचार करण्यात आला आहे.

लम्पी त्वचा रोग हा औषधोपचाराने निश्चित बरा होत असून आजारी जनावरांचे विलगीकरण करणे आवश्यक आहे. पशुसंवर्धन विभागामार्फत बाधित व सतर्कता क्षेत्रात मोफत लसीकरण व आजारी जनावरांना मोफत औषधोपचार शेतकऱ्यांच्या दारात करण्यात येत आहे.ग्रामपंचायतीमार्फत जनावरे व गोठ्यांची फवारणी प्रतिबंधक उपाय म्हणून करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आजाराची लक्षणे आढळल्यास तात्काळ नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.

पशुसंवर्धन विभाग व जिल्हा यंत्रणेकडून सदर रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून जिल्हास्तरीय यंत्रणा सज्ज आहे. आजारी जनावरे औषधोपचार करून निश्चित बरे होतात. सदर रोग हा प्राण्यांमधून मनुष्याला संक्रमित होत नसल्यामुळे जनावरांचे दूध सेवनासाठी सुरक्षित आहे. तेव्हा पशुपालकांनी घाबरून न जाता जनावरांमध्ये लम्पी स्कीन डिसीज आजाराची लक्षणे आढळल्यास त्वरित नजीकच्या पशुवैद्यकीय संस्थेसोबत संपर्क साधावा अथवा पशुसंवर्धन विभागाच्या 18002330418 किंवा 1962 या टोल फ्री क्रमांकावर तात्काळ कळवावे. असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हानेजिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. उमेश हिरुडकर यांनी केले आहे.

000000

No comments:

Post a Comment