‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियानातंर्गत कार्यशाळा
चंद्रपूर, दि. 30 सप्टेंबर : सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडून नवरात्र उत्सवादरम्यान 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर 2022 या कालावधीत ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ ही मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने चंद्रपूर, जिल्हा सामान्य रुग्णालयातर्फे स्थानिक औद्योगिक प्रशिक्षण संस्था,(मुलींची) चंद्रपूर,येथे विविध व्यवसायामध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थीकरीता एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
माता सुरक्षित तर घर सुरक्षित या कार्यशाळेमध्ये महिलांचे मानसिक विकार व विकास, तणावमुक्त जीवन याबाबत माहिती देऊन त्यावरील उपचार पद्धती तसेच व्यसनमुक्ती, राष्ट्रीय तंबाखु नियंत्रण कार्यक्रमातंर्गत तंबाखुजन्य पदार्थ सेवन केल्यामुळे होणारे दुष्परिणाम, कॅन्सर, आदी रोगाबद्दल माहिती देऊन तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन करण्यात आले. माता सुरक्षित तर घर सुरक्षित मोहिमेची कार्यशाळेच्या यशस्वितेकरिता जिल्हा सामान्य रुग्णालय व औद्योगिक प्रशिक्षण संस्था (मुलींची), चंद्रपूर येथील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
००००००
No comments:
Post a Comment