केंद्र शासनाची रस्ता सुरक्षा संदर्भात योजना
चंद्रपूर, दि. 16 सप्टेंबर : केंद्र शासनाद्वारे रस्ता सुरक्षा संदर्भात नवीन योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेचे नाव रस्ता सुरक्षा व्यवस्थापन करण्यासाठी आर्थिक सहाय्य व रस्ता सुरक्षा क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार असे आहे.
केंद्र शासनाच्या सदर योजनेअन्वये रस्ता सुरक्षा संदर्भातील कार्यक्षेत्रात या विषयांमध्ये उत्कृष्ट, अति उत्कृष्ट कार्य करणारे व्यक्ती, व संस्थांनी आपले अर्ज https://morth.nic.in या ऑनलाईन पोर्टलवर सादर करावेत. सदर पोर्टल हे दि. 1 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत कार्यरत राहील.
आपल्या कार्यक्षेत्रातील रस्ता सुरक्षासंबंधी कार्य करणाऱ्या पात्र व्यक्ती व संस्थांनी त्यांचे प्रस्ताव ऑनलाइन पोर्टलवर प्रस्तुत करावेत. ऑनलाइन पोर्टल व्यतिरीक्त इतर स्वरूपात प्रस्ताव व ऑनलाईन पोर्टलवर अर्ज केलेल्या प्रस्तावाच्या हार्डकॉपी स्विकारण्यात येणार नाही. सदर योजनेबाबत सविस्तर माहिती व सूचना केंद्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे, असे मुंबई, परिवहन आयुक्त कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment