Search This Blog

Friday 23 September 2022

राजुरा तालुक्यात 15 गावांतील जनावरांचे नि:शुल्क लसीकरण


 

राजुरा तालुक्यात 15 गावांतील जनावरांचे नि:शुल्क लसीकरण

चंद्रपूर, दि. 23 सप्टेंबर : लंपी चर्म रोगाने राजुरा तालुक्यातील जनावरांना विळखा घातला मौजा रामपूर आणि आर्वी येथील जनावरांमध्ये सदर रोगाची लक्षणे आढळली आहेत. मौजा रामपूर येथे तीन आणि आर्वी येथे चार जनावरांना लंपी रोगाची बाधा झाल्याचे आढळून आल्याने जनावरांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. तत्पूर्वी बाधित क्षेत्रातील आणि पाच किलोमीटर परिघातील एकूण 15 गावातील जनावरांना निःशुल्क लसीकरण करण्यात आले.

जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मंगेश काळेसहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन डॉ. सुचिता धांडेजिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ.उमेश हिरुडकरपशुधन विकास अधिकारी (विस्तार) डॉ. प्रमोद जल्लेवार यांनी रामपूर आणि आर्वी येथील जनावरांची तपासणी केली. यावेळी तहसीलदार हरीष गाडे आणि गट विकास अधिकारी  हेमंत भिंगारदेवे यांचे सहकार्य लाभले.

लंपी चर्म रोगाची लक्षणे : ताप येणेचारा कमी खाणेपाणी कमी पिणेदूध उत्पादनात घटत्वचेवर गाठी येणेडोळ्यातून नाकातून स्त्राव वाहणेलासिकाग्रंथिंना सूज येणे अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात. गोठ्यातील स्वच्छता आणि ह्या रोगाचे मूळ असणारे गोचीडचावणाऱ्या गोमाशाचिलटेडास ह्यांचे वर नियंत्रण केल्यास रोग प्रसारास अटकाव होईल. तसेच व्यवस्थित नियोजन केल्यास रोगावर नियंत्रण होवू शकते.

लसीकरण मोहिमेत पशुधन पर्यवेक्षक कैलाश राठोडरंजीता मेडपल्लिवार, चारुता पेंढारकर, सूरज गेडामसुभाष आकुलवारसंदीप आडेमोरेश्वर बुरांडेपरिचर श्री. वाढईश्री.वंजारीश्री. तामगाडगे श्री. शेडमाकेमाधव राठोडहुसेनतसेच तालुक्यात पशुवैद्यकीय संस्थांना सेवा देणारे आदित्य बोबडेश्री. निमकरश्रेया पळसपगारसाक्षी बारापात्रेशंकर वाढईअजिंक्य रामटेके, अनिल चव्हाण आदींनी 15 गावांमध्ये एका दिवशी  लसीकरण करण्यास सहकार्य केले.

०००००००

No comments:

Post a Comment