Search This Blog

Wednesday, 7 September 2022

शेतकरी उत्पादक संघ/कंपनीकडून गोदाम बांधकामासाठी अर्ज आमंत्रित

 


शेतकरी उत्पादक संघ/कंपनीकडून गोदाम बांधकामासाठी अर्ज आमंत्रित

Ø 12 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

            चंद्रपूरदि. 7 सप्टेंबर : राष्ट्रीय खाद्य तेल अभियान सन 2022-23 अंतर्गत गळीतधान्य उत्पादनाच्या सुरक्षित साठवणुकीसाठी व मुल्यवृध्दीसाठी गोदाम सुविधा आवश्यक आहे.  ज्या ठिकाणी गळीतधान्य पिके घेतली जातात परंतू गोदामाची व्यवस्था नाही, अशा ठिकाणी गोदाम बांधकाम करावे. या अभियानांतर्गत जिल्हयास 1 गोदाम बांधकाम घटकाचे लक्षांक प्राप्त आहे.  250 मे. टन क्षमतेचे गोदाम बांधकाम करण्यासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा जास्तीत जास्त रू. 12.50 लक्ष यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय राहील. या योजनेकरीता सदर बाब बँक कर्जाशी निगडीत असून केंद्र शासनाच्या ग्रामीण भंडारण योजना, नाबार्डच्या मार्गदर्शक सूचना लागू राहतील. सदर घटकासाठी शेतकरी उत्पादक संघ / कंपनी अर्ज करू शकतील.

तरी, इच्छुक शेतकरी उत्पादक संघ व कंपन्यानी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 12 सप्टेंबर 2022 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment