Search This Blog

Monday 12 September 2022

जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचा शुभारंभ स्वयंस्फूर्तीने नेत्रदान करण्याचे आवाहन

 


जिल्हा सामान्य रुग्णालयात नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचा शुभारंभ 

Ø स्वयंस्फूर्तीने नेत्रदान करण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि.12 सप्टेंबर: जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे 37 वा नेत्रदान पंधरवाडा उपक्रमाचे उद्घाटन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड यांच्या मार्गदर्शनात करण्यात आले.

 

याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. बंडू रामटेकेनाककान व घसा तज्ज्ञ डॉ. कनिरेनेत्रशल्य चिकित्सक डॉ.पटेलडॉ. सरोडेनोडल अधिकारी श्री. मसराम तसेच जिल्ह्यातील सर्व नेत्रचिकित्सा अधिकारीमनोविकृती सोशल अधीक्षक श्री. मारशेट्टीवर व नर्सिंग स्कूलच्या विद्यार्थिनी आदी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

        यावेळी डॉ. निवृत्ती राठोड म्हणाले, भारतात डोळ्याच्या बुबुळाणे ग्रस्त रुग्णांची संख्या सर्वाधिक असून त्यामानाने नेत्रदान करणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे नेत्रदान करणाऱ्यांचे प्रमाण खूपच कमी झाले होते. सद्यस्थितीत नेत्रदानाचे प्रमाण हळूहळू वाढत आहे. नेत्रदान केल्याने रुग्णाच्या चेहऱ्याला कुठलीही विद्रूपता येत नाही. इच्छुक व्यक्तींनी मरणोत्तर नेत्रदान करावे व दृष्टिहीन व्यक्तीच्या जीवनात प्रकाश निर्माण करावा. तसेच हे जग पुनः बघण्याची संधी उपलब्ध करून द्यावी. यासाठी जनतेने स्वयंस्फूर्तीने नेत्रदानासाठी पुढे यावे. आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेत्रदानासाठी सहकार्य करावे. नेत्रदानास इच्छुक व्यक्तींनी जिल्हा सामान्य रुग्णालयचंद्रपूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले. 

प्रास्ताविकेतून नेत्रदान पंधरवाड्याचा उद्देश्य सांगताना नेत्र शल्य चिकित्सक डॉ. पटेल म्हणाले, बुबुळाच्या आजाराने रुग्णाची संख्या वाढत आहे. त्यावर एकच उपाय म्हणजे मृत व्यक्तीचा निरोगी बुबुळ प्रत्यारोपण करणे हा होय. याकरीता मरणोत्तर नेत्रदान करून बुबुळाची मागणी व पुरवठा यामधील तफावत दूर करणे आवश्यक आहे. 

तसेच मरणोत्तर नेत्रदान कोणालाही करता येत असून मृत्यूनंतर सहा तासाच्या आत नेत्रदान करणे आवश्यक आहे. इच्छापत्र भरले नसले तरीही नातेवाईकांच्या सहमतीने नेत्रदान करता येते, असे त्यांनी सांगितले. यावेळी मरणोत्तर नेत्रदान केलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचालन नेत्रचिकित्सा अधिकारी गौरव झाडे यांनी तर आभार दीपक अंबादे यांनी मानले.

०००००

No comments:

Post a Comment