Search This Blog

Saturday 10 September 2022

भुस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती न होण्यासाठी उपाययोजना करणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार


 

भुस्‍खलन घटनेची पुनरावृत्‍ती न होण्यासाठी उपाययोजना करणार - मंत्री सुधीर मुनगंटीवार

Ø घुग्गुस येथील स्‍थलांतरीत कुटुंबांना धनादेशाचे वितरण

चंद्रपूरदि. 10 सप्टेंबर : घुग्‍गुस येथे झालेली भुस्‍खलनाची घटना अतिशय दुर्देवी आहे. अशा प्रकारच्या घटना भविष्यात पुन्‍हा घडू नयेयादृष्‍टीने प्रभावी उपाययोजना करण्‍याचा कसोशीने प्रयत्‍न करण्‍यात येईलअशी ग्वाही राज्याचे वनेसांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

भूस्खलननाच्या घटनेत स्‍थलांतरीत कुटुंबांसाठी मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्‍येकी १० हजार रूपये तसेच पक्षातर्फे प्रत्‍येकी ३ हजार रूपये मदत प्राथमिक स्‍तरावर करण्‍यात आली असली तरीही आणखी काय मदत करता येईलही बाब तपासून आणखी मदत देण्यासाठी प्रयत्न करू. आम्ही नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोतअसेही त्यांनी स्पष्ट केले.

घुग्‍गस येथे मुख्‍यमंत्री सहाय्यता निधीतून मंजूर धनादेशाचे संबंधित कुटुंब प्रमुखांना वितरण करतांना ते बोलत होते. यावेळी देवराव भोंगळेतहसीलदार निलेश गोंडविवेक बोढेपंचायत समितीचे माजी उपसभापती निरीक्षण तांड्रासिनू इसारप आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील आमराई वॉर्डात 26 ऑगस्ट रोजी गजानन मडावी यांचे घर भुस्खलनामुळे जमिनीत 60 ते 70 फूट जमिनीत गेले. या घटनेची मंत्री श्री. मुनगंटीवार यांनी तात्काळ दखल घेऊन प्रशासनाच्या अधिका-यांसोबत घटनास्थळाला भेट दिली. यावेळी गावक-यांसोबत चर्चा करतांना त्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत मिळवून देण्याचे आश्वासन गावक-यांना दिले होते. यासाठी स्वत: पुढाकार घेत मुंबईत पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 10 दिवसांच्या आत 16 लक्ष रुपयांचा निधी पिडीत कुटुंबासाठी मंजूर करून आणला. भुस्खलनाचा धोका असलेल्या 160 कुटुंबांना प्रशासनाने इतरत्र स्थलांतरीत केले आहे. मंजूर अर्थसहाय्यातून प्रत्येक कुटुंब प्रमुखाला 10 हजार रुपये याप्रमाणे 16 लक्ष रुपये तातडीने वाटण्यात आले आहे.

कार्यक्रमाला संतोष नुनेअमोल थेरेशरद गेडामसुशील डांगेविवेक तिवारीविनोद चौधरीहेमंत कुमारधनराज पारखीसुरेंद्र भोंगळेविनोद जंजर्लाचिन्‍नाजी नलबोगा आदींची उपस्थिती होती.

00000

No comments:

Post a Comment