Search This Blog

Thursday, 22 September 2022

अपूर्ण बाबी पूर्ण करून क्रीडा संकुलातील सुविधा खेळाडुंना सरावाकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार

 पूर्ण बाबी पूर्ण करून क्रीडा संकुलातील सुविधा खेळाडुंना

सरावाकरीता उपलब्ध करुन देण्यात येणार

चंद्रपूर दि. 22 सप्टेंबर : जिल्हा क्रीडा संकुल येथील क्रीडा सुविधेत वाढ करण्याकरिता शासनाकडून प्राप्त 12 कोटी रु. अनुदानातून 400 मीटर आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिंथेटिक स्मार्ट धावनपथ, नॅचरल ग्रास फुटबॉल मैदान व मुला-मुलींच्या चेंजिंग रूमसह प्रसाधनगृह आदी बांधकाम चंद्रपूर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने हाती घेण्यात आले होते. त्यानुसार मुख्य सुविधा पूर्ण झालेल्या असून सार्वजनिक बांधकाम विभागाचे दि. 17 ऑगस्ट 2022 रोजीच्या प्राप्त पत्रान्वये या विभागास सुविधा हस्तांतरण करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

परंतु समितीचे वास्तू शिल्पतज्ञ यांनी पूर्ण झालेल्या क्रीडा सुविधांची तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण आहे किंवा कसे? याबाबत प्रत्यक्ष पाहणी केली असता काही बाबी अपूर्ण असल्याचे आढळून आले. यासंदर्भात संबंधित कंत्राटदाराने 8 दिवसात अपूर्ण बाबी पूर्ण करून देण्याबाबत क्रीडा कार्यालयास अवगत करून दिले. परिपूर्ण झालेल्या क्रीडा सुविधा प्रत्यक्ष ताब्यात घेण्याबाबत जिल्हा क्रीडा संकुल समितीचे उपाध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांनी दि.7 सप्टेंबर रोजी मान्यता प्रदान केली. सदर अपूर्ण क्रीडा सुविधा कंत्राटदारामार्फत लवकरात लवकर पूर्ण करून सर्व क्रीडा सुविधा ताब्यात घेऊन तसा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागास पाठविण्यात येत आहे.

सुविधा अपूर्ण असल्यामुळे 20 सप्टेंबरपर्यंत क्रीडा अधिकारी कार्यालयाने क्रीडा सुविधा ताब्यात घेतल्या नाही. त्यामुळे सदर सुविधांचे खेळाडूंना सरावाकरिता मैदान उपलब्ध करून देण्यास नकार दिला हे चुकीचे आहे, असे जिल्हा क्रीडा अधिकारी तथा जिल्हा क्रीडा संकुल समितीचे सचिव अविनाश पुंड यांनी प्रसिद्धीपत्रकांन्वये कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment