पोषण अभियान अंतर्गत मोरवा येथे ‘स्वस्थ बालक बालिका’ स्पर्धा
Ø जिल्हाधिका-यांच्या हस्ते चिमुकल्यांना बक्षीस वितरण
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : पोषण अभियान 2022 अंतर्गत ग्रामपंचायत मोरवा येथे एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चंद्रपूरतर्फे ‘स्वस्थ बालक बालिका’ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, अध्यक्ष म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार यांच्यासह उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संग्राम शिंदे, गटविकास अधिकारी आशुतोष सपकाळ, बालविकास प्रकल्प अधिकारी आरती जगताप, उमेदचे मनोहर वाकडे, मोरवाचे सरपंच स्नेहा साव, उपसरपंच भूषण पिदुरकर आदी उपस्थित होते.
चंद्रपूर तालुक्यामध्ये पोषण अभियानाअंतर्गत 1 ते 30 सप्टेंबर या कालावधीत समाजामध्ये पोषणाबाबत जनजागृती करण्यात आली. व्यापक प्रमाणात कार्यक्रम घेतल्यामुळे पोषण अभियानाला लोक चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले. मातांना बालकांच्या पोषणाविषयी सक्षम करण्यासाठी आणि त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी चंद्रपूर प्रकल्पाने प्रत्येक अंगणवाडीत “ स्वस्थ बालक बालिका स्पर्धा” आयोजित केली. 6 महिने ते 3 वर्षे आणि 3 ते 5 वर्ष या वयोगटातील स्वस्थ बालक बालिकांची निवड करून त्यांचा अंगणवाडी केंद्रामध्ये सत्कार करून पारितोषिक देण्यात आले .
त्यापैकी पाच बालकांची निवड प्रकल्प स्तरावर करण्यात आली. मोरवा येथे घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय स्पर्धेत आर्या प्रवीण घिवे, रुद्र संतोष कांबळे, वैष्णवी भास्कर तोडासे, तनुजा गौतम जाधव, संस्कार मनोज तुरकर या बालकांची स्वस्थ बालक- बालिका म्हणून निवड करण्यात आली व त्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. तसेच पोषण अभियानांतर्गत नागरिकांना पोषणाचे महत्त्व कळावे याकरिता अंगणवाडी सेविका व उमेदच्या कार्यकर्त्यांमार्फत पोषण आहाराची प्रदर्शनी लावण्यात आली. प्रदर्शनीचे उद्घाटन जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संग्राम शिंदे यांनी केले. संचालन पर्यवेक्षिका सुजाता रामटेके यांनी तर आभार बालविकास प्रकल्प अधिकारी आरती जगताप यांनी मानले. यावेळी शीतल देरकर, अंगणवाडी पर्यवेक्षिका सुजाता कातकर, मीना भगत, सुनिता सोयाम, दीपा हमंद ,शीतल भुमर, शिल्पा कुंभलकर, प्रेषित माणूसमारे, लक्ष्मीकांत जांबुळे यांच्यासह एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प तसेच सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.
००००००
No comments:
Post a Comment