तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी शिबिराचे आयोजन
चंद्रपूर,दि. 22 सप्टेंबर : सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून तृतीयपंथीय व्यक्तीसाठी नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन हे राष्ट्रीय पोर्टल सुरु करण्यात आले आहे. सदर पोर्टलवर तृतीयपंथी व्यक्तींना प्रमाणपत्र व ओळखपत्र मिळण्यासाठी अर्ज करण्यासाठी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
दि. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2022 या कालावधीत सेवा पंधरवडा शासनाने घोषित केला आहे. त्याचे औचित्य साधून दि. 27 सप्टेंबर रोजी सहायक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्याय भवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे एक दिवसीय शिबिर आयोजित केले आहे. सदर शिबिरात तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथीय असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तृतीयपंथीय व्यक्ती व या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी दि. 27 सप्टेंबर 2022 रोजी आयोजित केलेल्या तृतीयपंथीय व्यक्तींच्या शिबिराला सकाळी 10:30 ते 5:30 या वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.
००००००
No comments:
Post a Comment