जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते दोनशे मुलींना नियुक्तीपत्र वितरीत
चंद्रपूर,दि. 26 सप्टेंबर : 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवाडा जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. सेवा पंधरवाडा अंतर्गत विविध विभागाकडून उपक्रम राबविण्यात येत आहे.
चिमूर, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय व टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, कृष्णागिरी, तामिळनाडू या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने ज्युनियर टेक्निशियन या पदाकरीता जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या मुलींसाठी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
प्रकल्प अधिकारी के. ई. बावणकर यांच्या पुढाकाराने दि. 25 सप्टेंबर 2022 रोजी नेहरु विद्यालय, चिमूर येथे सकाळी 11 वाजता सदर पदाकरीता भरती परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 218 (मुली) उमेदवार सहभागी झाले होते. त्यापैकी पात्र 200 मुलींची निवड करण्यात आली. निवड करण्यात आलेल्या मुलींना टाटा इलेक्ट्रॉनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्यावतीने ज्युनियर टेक्निशियन या पदावर नियुक्ती मिळाली असून या मुलींना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांच्या हस्ते नियुक्तीपत्र वितरित करण्यात आले.
00000
No comments:
Post a Comment