हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षणाकरीता अर्ज आमंत्रित
Ø 30 सप्टेंबरपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 20 सप्टेंबर : महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 10 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 1 ते 30 ऑक्टोबर 2022 या कालावधीत रोज दुपारी 12 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये हॉटेल व्यवसायातील उद्योगसंधी, बृमिंग, स्वच्छता, सर्व्हिस, कुकींग तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी आदी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 30 सप्टेबंर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे मो. 9011667717 व कार्यक्रम आयोजिका गायत्री गरडवा मो. 9022067714 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.
००००००
No comments:
Post a Comment