Search This Blog

Tuesday, 20 September 2022

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

पशुधनावर आधारित शेळीपालन, कुक्कूटपालन व दुग्धव्यवसाय प्रशिक्षण

Ø जिल्ह्यातील युवक-युवतींना लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 20 सप्टेंबर :  महाराष्ट्र उद्योजकता विकास केद्रांद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता दि. 26 ते 30 सप्टेंबर 2022 या कालावधीत रोज दुपारी 12 ते सांयकाळी 4 वाजेपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्धव्यवसाय यामधील उद्योगसंधी, शेडची रचना, व्यवसायाचे फायदे, शेळी, गाय व कोंबड्याच्या विविध जाती, पैदास, निवड, प्रजनन, औषधोपचार, लसीकरण, निगा व संरक्षण प्रतिबंधक उपाय त्यांचे संगोपन व व्यवस्थापन, संतुलित आहार, जीवनसत्वाचे महत्व, संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजना, उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास, यशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शन, कर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन, पशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी आदी विषयांवर विशेष तज्ञ व शासकीय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे

            सदर प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतींनी www.mced.co.in या संकेतस्थळावर दि. 25 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड, दुरध्वनी क्रमांक 07172-274416, 9403078773, कार्यक्रम आयोजक मिलींद कुंभारे मो. 9011667717 व कार्यक्रम आयोजिका लक्ष्मी खोब्रागडे मो. 9309574045 यांच्याशी संपर्क साधावा, असे प्रकल्प अधिकारी के. व्ही. राठोड यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment