सुधारीत दौरा :
अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड
यांचा चंद्रपूर चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर, दि. 29 सप्टेंबर : राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि. 30 सप्टेंबर 2022 रोजी सकाळी 10 वाजता शासकीय विश्रामगृह, चंद्रपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण. सायं. 6.15 वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव व मुक्काम. शनिवार दि. 1 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.30 वाजता माता महाकाली महोत्सवाचे उद्घाटन, सकाळी 10 वाजता आमदार किशोर जोरगेवार यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट, सकाळी 11 वाजता शासकीय विश्रामगृह चंद्रपूर येथे जिल्हा अन्न व औषध प्रशासन अधिका-यांसोबत बैठक, 11.45 वाजता पदाधिका-यांसोबत बैठक, दुपारी 1.30 वाजता मातोश्री मंगल कार्यालय येथे कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थिती, 3.30 वाजता शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, 4.45 वाजता पडोली येथे गुरु तेजबहादुर साहेब गुरुद्वाराला सदिच्छा भेट, सायंकाळी 5 वाजता यवतमाळकडे प्रयाण.
०००००००
No comments:
Post a Comment