Search This Blog

Friday 23 September 2022

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य पदवीदान

 

अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य पदवीदान

चंद्रपूर,दि. 23 सप्टेंबर : डी.जी.टी आणि व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई, कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या सूचनेनुसार अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण प्रशिक्षणार्थ्यांना कौशल्य पदवीदान दीक्षांत समारंभ साई औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर येथे दि. 21 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता.

या कार्यक्रमाप्रसंगी संस्थेचे सचिव अमित येरगुडे, कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता अधिकारी भाग्यश्री वाघमारे, सरपंच मंजूषा येरगुडे, साई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विनोद गोरंटीवार, राजेश पेशट्टीवार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. 

 अखिल भारतीय व्यवसाय परीक्षा 2022 मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रत्येक व्यवसाय निहाय, प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या 15 प्रशिक्षणार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रीय व्यवसाय प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्तीर्ण  प्रशिक्षणार्थ्यांचे कौतुक करून त्यांच्या उज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे संचालन व आभार वर्षा गावंडे यांनी मानले.

००००००

No comments:

Post a Comment