17 ऑक्टोबर रोजी निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
चंद्रपूर, दि. 28 सप्टेंबर : निवृत्तीवेतन प्रकरणाचा आढावा घेण्याच्या दृष्टीने दि. 17 ऑॅक्टोबर 2022 ला सकाळी 11 वाजता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ९० वर्ष पूर्ण केलेले निवृत्तीवेतन धारकांचा त्याच दिवशी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. ८०वर्षावरील ज्या कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना सदर लाभ मिळालेला नाही, अशा निवृत्तीवेतन धारकांनी येतांना त्यांचे जन्म तारखेची नोंद असल्याबाबचा पुराव्याहस उपस्थित राहवे. जेणेकरून त्यांना शासन निर्णयानुसार प्रदान करण्यात येणारे वाढीव दराने निवृत्तीवेतन मंजूर करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
तरी १७ ऑक्टोबर २०२२ रोजी जिल्हा कोषागार कार्यालय, चौथा माळा, लेखा कोष भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, चंद्रपूर येथे निवृत्तीवेतनधारक /कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांनी आपल्या अडचणी सोडवण्याचे दृष्टीने उपस्थित राहावे ,असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी प्रफूल्ल वडेट्टीवार यांनी केले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment