Search This Blog

Wednesday, 21 September 2022

कृषी विभागाअंतर्गत रोजंदारी मजुरांची जिल्हास्तरावर एकत्रित अंतरीम जेष्ठतासुची प्रसिद्ध

 

कृषी विभागाअंतर्गत रोजंदारी मजुरांची जिल्हास्तरावर एकत्रित अंतरीम जेष्ठतासुची प्रसिद्ध

Ø आक्षेप असल्यास कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर : कृषी विभागाअंतर्गत येत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व तालुका बीज गुणन केंद्र व फळरोपवाटीका येथील रोजंदारी मजुरांची जिल्हास्तरावर एकत्रित अंतरीम जेष्ठतासुची तयार करण्यात आली आहे. सदर जेष्ठतासुची चंद्रपूर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सुचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.

अंतरीम जेष्ठातासूचीबाबत रोजंदारी मजूरांचे आक्षेप (जन्मतारीख व शैक्षणिक पात्रतेबाबत) असल्यास त्यांनी लेखी पुराव्यासह 10 दिवसाच्या आत जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अन्यथा त्यांची नावे अंतीम यादीमधून वगळण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment