Search This Blog

Friday, 2 September 2022

पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसी करीता 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

 


पीएम किसान सन्मान निधी ऑनलाइन केवायसी करीता 7 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

चंद्रपूर, दि. 2 सप्टेंबर :  पीएम किसान सन्मान निधीच्या ऑनलाईन केवायसीची मुदत आता 7 सप्टेंबर 2022 पर्यंत करण्यात वाढविण्यात आली आहे. त्यामुळे लाभार्थी शेतक-यांनी त्वरीत ऑनलाईन केवायसी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

लाभार्थी शेतकऱ्यांनी 7 सप्टेंबर 2022 पर्यंत ऑनलाईन केवायसी केल्यास त्यांच्या खात्यात सन्मान योजनेचा दोन हजार रुपयांचा हप्ता जमा केला जाईल. ऑनलाईन केवायसी केले नाही तर सदर योजनेचा लाभ मिळणार नाही. सदर योजना ओटीपीवर आधारित असून लाभार्थी शेतकऱ्यांचा मोबाइल क्रमांक पीएम किसानचे वेबपोर्टल किंवा जवळच्या कॉमन सर्विस सेंटरशी सलग्न असावा.

ऑनलाईन केवायसीकरीता राबविण्यात येणारी प्रक्रिया :

ओटीपी मोड (मोबाईलद्वारे / संगणकाद्वारे) : पीएम किसानच्या अधिकृत वेब पेजला https://pmkisan.gov.in/ भेट द्या. वेब पेजच्या उजव्या बाजूला असलेल्या ई-केवायसी पर्यायाला क्लिक करा. स्वतःचा आधारकार्ड क्रमांक आणि कॅपचा कोड टाकून सर्च करा. आधारकार्ड लिंक असलेला मोबाईल क्रमांक टाका आणि क्लिक करा. ओटीपी आल्यानंतर संबंधित जागेवर ओटीपी भरा व सबमीट करा.

बायोमेट्रीक मोड (महा ई सेवा केंद्रातून) : नजीकच्या नागरी सेवा केंद्रावर (सीएससी) जाऊन प्रक्रिया करता येईल. तसेच ई-सेवा केंद्रावर जातांना आपल्या आधारकार्डची झेरॉक्स सोबत घेऊन जा.

वरीलप्रमाणे ई – केवायसी पूर्ण करा आणि प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घ्या, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment