Search This Blog

Wednesday, 21 September 2022

29 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


29 सप्टेंबर रोजी पंडित दिनदयाळ उपाध्या रोजगार मेळाव्याचे आयोजन

            चंद्रपूर, दि. 21 सप्टेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 29 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 वाजेपर्यत डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, वरोरा नाका, चंद्रपूर  येथे  पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

                       सदर मेळाव्यामध्ये फ्लिपकार्ट येथे डिलीव्हरी बॉय, इनोवसोर्स, नागपूर यांच्या बॅकीग ॲड फायनांस पोस्टकरीता, युरेका फोर्ब्स यांच्या सेल्स अॅंड मार्केटिंग, नवभारत फर्टिलायझर लिमीटेड यांच्या सेल्स ॲड ट्रेनी, ॲलेक्सी मुच्युअल फंड निधी लिमीटेड यांच्या सेल्स ऑफीसर, सेल्स मॅनेजर, ब्रॅंच मॅनेजर, बजाज ऑटो लिमीटेड औरंगाबाद  यांच्या प्रोडक्शन इंजिनीअरींग, टॅलेनसेतू सर्व्हिसेस प्रा.लि पुणेच्या डिप्लोमा इंजिनीअरीग आदी प्रकारची पदे भरण्यात येणार आहे. या मेळाव्यातून  नागपूर, औरंगाबाद, पुणे येथे रोजगाराची संधी उपलब्ध होत आहे. सदर कंपनीकडे सद्यस्थितीत जवळपास एकुण 350 रिक्त जागा असल्याचे कंपनीमार्फत कळविण्यात आले आहे. सदर मेळाव्याकरीता उमेदवारांनी आधारकार्ड  व शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रासह उपस्थित राहावे.

                       तसेच दि.28, 29 व 30 सप्टेंबर 2022 रोजी सदर कंपनीचे व्यवस्थापक ऑनलाइन रोजगार मेळाव्याकरीता उपस्थित राहणार आहेत. जे उमेदवार दि.29 सप्टेंबरच्या ऑफलाइन मेळाव्याकरीता उपस्थित राहु शकणार नाही, त्यांनी ऑनलाइन मेळाव्यामध्ये सहभागी व्हावे. ऑनलाइन मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता https://rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाइटवर नोंदणी करावी व ऑनलाइन अप्लाय करावेअधिक माहीतीकरीता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 07172-252295 या  दुरध्वनी क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment