सुरक्षा रक्षक मंडळात नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ प्रस्तावित
Ø निवेदने व हरकती 10 दिवसांच्या आत सादर करण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 16 सप्टेंबर : सुरक्षा रक्षक मंडळामध्ये नोंदीत असलेल्या सुरक्षा रक्षकांचे वेतन व इतर भत्त्यांमध्ये वाढ करण्याची बाब मंडळाच्या विचाराधीन असून सदर वाढ दि. 1 जानेवारी 2022 पासून पुढील तीन वर्षाकरीता (1 जानेवारी 2022 ते 31 डिसेंबर 2024) लागु करण्याचे प्रस्तावित आहे. प्रस्तावित दरानुसार सुरक्षा रक्षकांच्या वेतन व भत्त्यात 1500 रुपयापर्यंत वाढ होणार आहे.
महाराष्ट्र खाजगी सुरक्षा रक्षक (नोकरीचे नियमन व कल्याण) अधिनियम,1981 व त्या अंतर्गत योजना 2012 मधील खंड/उपखंडानुसार निवेदने व हरकती मागवून वेतनाचे दर व भत्ते तसेच सेवाशर्ती निश्चित करण्याचे अधिकार मंडळास आहे. मंडळातील सुरक्षारक्षकांच्या वेतन व इतर भत्ते वाढीबाबतचा सविस्तर तपशिल मंडळाच्या नोटीस बोर्डावर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मंडळातील नोंदीत सुरक्षा रक्षकांच्या वेतन व इतर भत्त्यामध्ये वाढ करणेबाबत निवेदने व हरकती सादर करावयाच्या असल्यास नोटीस प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवसाच्या आत किंवा त्यापुर्वी मंडळाच्या कार्यालयात लेखी स्वरुपात सादर करावे. त्यानंतर आलेल्या अभिवेदनाचा विचार करण्यात येणार नाही, असे आवाहन सहायक कामगार आयुक्त तथा चंद्रपूर जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती भोईटे यांनी केले आहे.
०००००
No comments:
Post a Comment