Search This Blog

Wednesday 16 September 2020

सोयाबीन बियाणे घरगुती पध्दतीने तयार करतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन


 

सोयाबीन बियाणे घरगुती पध्दतीने तयार करतांना काळजी घेण्याचे कृषी विभागाचे आवाहन

कृषी विभागाने दिलेल्या माहितीचा करावा वापर

चंद्रपूर दि. 16 सप्टेंबर: सोयाबीन पिकाचे पेरणी करण्याकरीता सुधारीत वाणाचा उपयोग केला जातो. हे वाण सरळ वाण असुन स्वपरागसिंचीत असल्यामुळे दरवर्षी बाजारातुन बियाणे खरेदी करण्याची आवश्यकता नाही. सोयाबीन बियाणे अत्यंत नाजुक असल्यामुळे बियाण्याची मोठया प्रमाणावर हाताळणीवाहतुकीत होणारी आदळ- आपटबियाण्याची अयोग्य पध्दतीत साठवण व मळणी करतांना योग्य ती काळजी न घेतल्यामुळे उगवणशक्तीवर परीणाम झाल्याचे अनुभव शेतकऱ्यांना आलेले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाणे घरगुती पध्दतीने तयार करतांना कृषी विभागाने दिलेल्या माहितीचा शेतकऱ्यांनी अवलंब करावाअसे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.उदय पाटील यांनी केले आहे.

अशी घ्यावी काळजी:

सोयाबीनच्या प्रमाणित बियाण्याची तसेच 10 वर्षा आतील प्रसारित झालेल्या वाणाची चालु हंगामात पेरणी केली असेल तर शेतकऱ्यांनी त्यांचेकडे उत्पादीत होणारे सोयाबीन प्रथम प्राधान्याने    बियाण्याकरीता निवड करावी. बियाण्यासाठी निवड करण्यात आलेल्या प्लॉटमध्ये भेसळयुक्त झाडेतणाची झाडे व इतर ऑफ टाईप झाडे काढुन टाकावी.

बियाण्याकरीता निवडण्यात येणाऱ्या  प्लॉटच्या सभोवताली 3 मिटर अंतर सोडुन आतील उत्पादीत होणारे सोयाबीनबियाण्याकरीता निवडावे. अशा निवडलेल्या सोयाबीन प्लॉटवर सोयाबीन परिपक्व होण्याच्या अवस्थेत आंतरप्रवाही बुरशी नाशक (टेबुकोनॅझोल) ची फवारणी करावी हयामुळे बियाण्याव्दारे प्रसार होणाऱ्या बुरशीजन्य रोगापासुन बियाण्यांचे संरक्षण होईल.

निवडलेल्या प्लॉटमधील सोयाबीनची कापणी योग्य वेळी करून त्याला  वाळवावे. वाळवल्यानंतर  मळणी शक्यतोवर पारंपारीक पध्दतीने काठीच्या सहाय्याने बुडवून करावी किंवा मळणी यंत्राद्वारे करावयाची असल्यास मळणी यंत्राचा वेग 300 ते 400 आरपीएम ठेवुनच करावी.

तयार झालेले सोयाबीन मधील आर्द्रता 9 ते 12 टक्केच्या दरम्यान राहील याची काळजी घ्यावी.साठवणुक करतांना असे बियाणे शक्यतोवर 50 किलो क्षमतेच्या गोणी (जुट) मध्ये राख व कडु लिंबाचा पाला मिश्रण करून साठवणुक करावी.

अशा पध्दतीने भरलेली पोती साठवणुक करतांना जमीनीपासुन 10 ते 15 सें.मी. उंचीवर लाकडी फळ्यांवर भिंतीपासून काही अंतरावर एकावर एक थप्पी लाऊन ठेवावी. थप्पी लावतांना आठ पेक्षा जास्त पोत्यांची लाऊ नये. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषुन घेते त्यामुळे भरलेली पोती कोरड्या हवेत ठेवावी.

काढणीमळणीपोती भरणे इत्यादी प्रक्रियेमध्ये बियाणे हाताळतांना आदळ- आपट होणार नाही. याची  काळजी घ्यावी. कारण सोयाबीन बियाण्याचे बाह्य आवरण अती पातळ असल्यामुळे पोती हाताळतांना आदळ आपट झाल्यास उगवणशक्तीवर परिणाम होऊन बियाण्याची उगवणशक्ती कमी होते. साठवणूक केलेल्या बियाण्याची पेरणीपुर्वी माहे डिसेंबरमार्च व जुनच्या पहिल्या आठवडयात साठवणूकी दरम्यानविक्री दरम्यान व प्रत्यक्ष पेरणी पुर्वी अनुक्रमे अशी तिन वेळा घरगुती पध्दतीने उगवणशक्ती तपासून घ्यावी जेणेकरून पेरणी करतांना बियाणे पेरणी योग्य आहे किंवा नाही याची खात्री पटेल व उगवणशक्तीच्या टक्केवारी नुसार बियाण्याची मात्रा पेरणी करीता वापरणे सोईचे होईल. शेवटची उगवणक्षमता तपासणी झाल्यानंतर बियाण्यास पेरणीपुर्वी रासायनिक व जैविक बिजप्रक्रिया करावी. बिजक्रियेकरीता थायरम किंवा कार्बनडायझिंन 25 ग्रॅम प्रती 10 किलो बियाणे तसेच जैविक बिजप्रक्रिये करीता रायझोबियम 25 ग्रॅम व 60 मिली ट्रायकोडर्मा प्रती 10 किलो बियाण्यास लावावी. पुढील खरीप हंगामाकरीता लागणाऱ्या सोयाबीन बियाण्याचे योग्य पध्दतीने शास्त्रोक्त नियोजन व साठवणूक करून पुढील हंगाम 2021-22 करीता वापर करावे. अधिक माहितीकरीता संबधीत गावातील कृषि सहाय्यककृषि पर्यवेक्षकमंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment