Search This Blog

Tuesday 8 September 2020

शैक्षणिक 2019-20 सत्राच्या गुणांच्या आधारे एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश


 

शैक्षणिक 2019-20 सत्राच्या गुणांच्या आधारे

एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये प्रवेश

चंद्रपूर,दि. 8 सप्टेंबर: आदिवासी विकास विभागांतर्गत एकलव्य मॉडल रेसिडेंशियल स्कुल मधील विद्यार्थी प्रवेशाकरीता दरवर्षी प्रवेशपूर्व स्पर्धा परीक्षा घेण्यात येते. शैक्षणिक सत्र 2020-21 मधील प्रवेशासाठी ऑनलाईन स्पर्धा परीक्षा घेण्याचे प्रस्तावित होते. परंतुकोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ऑनलाईन स्पर्धा परीक्षा रद्द करण्यात आलेली आहे. त्याऐवजी विद्यार्थ्यांच्या मागील वर्षाच्या (शैक्षणिक सत्र 2019-20) पहिल्या सत्राच्या गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांची गुणवत्ताक्रमानुसार प्रवेशासाठी निवड करणेकरीता शासनाने मान्यता दिली आहे. त्यामुळे प्रवेशाची कार्यवाही पालकांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावीअसे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी रोहन घुगे यांनी केले आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी सदर परीक्षेकरीता आवेदनपत्र भरले आहे. अशा सर्व विद्यार्थ्यांनी मागील वर्षाची प्रथम सत्रांत परीक्षा एकुण 900 गुणांची गुणपत्रिका संबंधित शाळेकडून प्राप्त करुन घ्यावी. पालकांनी किंवा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांचे गुण पत्रिकेतील गुण mtpss.org.in या लिंकवर भरुन स्कॅन केलेली गुणपत्रिकेची प्रत पीएनजीआयपीइजीजेपीजीपीडीएफ या स्वरूपात अपलोड करावी. (श्रेणीची गुणपत्रिका स्विकृत केली जाणार नाही). सदर कार्यवाही करण्याची अंतिम तारीख 15 सप्टेंबर आहे.

दिलेल्या लिंकवर माहिती भरतांना गुणपत्रिकेची स्कॅन कॉपी मोबाईलसंगणकमध्ये साठवून (सेव्ह) ठेवावी व नोंदणी केलेला मोबाईल ओटीपी करीता जवळ ठेवावा. गुणपत्रिका ऑनलाईन अपलोड करण्याच्या कार्यपध्दतीची सविस्तर माहिती (परिशिष्ट 1 व 2) संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकपालकविद्यार्थी यांना वेगळ्या पत्राव्दारे पाठविण्यात आलेली आहे. पत्र प्राप्त न झाल्यास पत्राची प्रत दिनांक 12 सप्टेंबर 2020 चे आत कार्यालयीन वेळेत प्रकल्प कार्यालयातून प्राप्त करुन घेता येईल. तसेच या संबंधाने काही तांत्रिक अडचणी येत असल्यास समन्वय अधिकारी अशोक बेलेकर  (मो.क्र. 9834138867) यांचेशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment