Search This Blog

Sunday 27 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5511 बाधितांना डिस्चार्ज



चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 5511 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 9582;

उपचार सुरु असणारे बाधित 3928

जिल्ह्यात 24 तासात 232 बाधितएका बाधिताचा मृत्यू

चंद्रपूरदि. 27 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 232 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 9 हजार 582 झाली आहे. यापैकी 5 हजार 511 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 928 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासामध्ये एका कोरोना बाधिताचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये रामपुरराजुरा येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 21 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 143 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 135तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 126 बाधितबल्लारपूर तालुक्यातील 12चिमूर तालुक्यातील तीनमुल तालुक्यातील 8गोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील 9ब्रह्मपुरी तालुक्यातील 12नागभीड तालुक्यातील 14वरोरा तालुक्यातील पाचभद्रावती तालुक्यातील एकसावली तालुक्यातील 12,  राजुरा तालुक्यातील 19यवतमाळ जिल्ह्यातील तीनगडचिरोली जिल्ह्यातील पाचवर्धा व तेलंगणा येथील प्रत्येकी एक असे एकूण 232 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपुर शहर व परिसरातील वृंदावन नगर, जिल्हा कारागृह, नगीनाबाग, वडगांवविठ्ठल मंदिर वार्ड, दत्त नगरसंजय नगरजलनगर, बाबुपेठ, रामनगरजटपुरा गेट, चोर खिडकीपठाणपुरा वार्डतुकुमअंचलेश्वर वार्डलालपेठ कॉलनीआकाशवाणी रोड परीसरभानापेठबंगाली कॅम्पबापट नगर, इंदिरा नगरनेहरु नगरपंचशिल चौकजीएमसी चौकक्रिष्णा नगरबालाजी वार्डनांदा फाटा, सरकार नगर, बालाजी वार्ड, घुग्घुस, उर्जानगर, दुर्गापुर या परीसरातुन बाधित पॉझिटीव्ह ठरले आहे.

तालुक्यात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील डॉ.राजेंद्र प्रसाद वार्डगोकुळ वार्डगांधी वार्डटिळक वार्डफुलसिंग नाईक वार्डविद्यानगर वार्ड या भागातून बाधित पुढे आले आहेत. चिमूर तालुक्यातील शंकरपुर या परिसरातून बाधित पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील चिरोली गावातून बाधित ठरले आहे. गोंडपिंपरी तालुक्यातील इंदिरानगर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

कोरपना तालुक्यातील उपरवाही परिसरातून बाधित ठरले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील देलणवाडीकोलारीनंन्होरीविद्यानगरनागेश्वर नगरगांधी नगरविद्या नगररानबोथली भागातून बाधित पुढे आले आहे.

नागभीड तालुक्यातील मिंढाळानवखाळा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. वरोरा तालुक्यातील माजरी भागातून बाधित पुढे आले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणारा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

राजुरा तालुक्यातील रमाबाई नगरसोमनाथपूर वार्डदेशपांडे वाडी परिसरजुना बस स्टॉप परिसरसास्तीरामनगरजवाहर नगरस्वप्नपूर्ती नगर परिसरातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment