Search This Blog

Wednesday 16 September 2020

माजी सैनिक व माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मालमत्ता करातून सुट

 माजी सैनिक व माजी सैनिकाच्या विधवा पत्नीस मालमत्ता करातून सुट

चंद्रपूर,दि.16 सप्टेंबर: महाराष्ट्र शासनाच्या विविध शासन निर्णयांद्वारे माजी सैनिक व माजी सैनिक विधवा यांच्या नावावर असलेल्या निवासी मालमत्तेच्या मालमत्ता करातून सुट देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या योजनेचा लाभ त्यांना लागू राहिल. ही सुट पात्र माजी सैनिकांना व माजी सैनिक विधवांना मिळणेकरीता त्यांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून पात्रता प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व संबंधित माजी सैनिक व माजी सैनिक विधवांनी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाकडून दिल्या गेलेले ओळखपत्र व मालमत्ता कराची छायांकित प्रत घेऊन जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयास संपर्क साधावा व पात्रता प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावेअसे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी दिपक लिमसे यांनी केले आहे.

00000000

No comments:

Post a Comment