Search This Blog

Saturday 5 September 2020

मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम

 मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम

युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि. 9 सप्टेंबर:महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र चंद्रपूरद्वारे 7 वी पास व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक व युवतींकरीता दि. 10 ते 13 सप्टेंबर (3 दिवस) कालावधीचे मशरुम लागवड व प्रक्रिया प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

सदर प्रशिक्षणामध्ये मशरुमचे प्रकार व ओळखलागवडसाहीत्य व कच्च मालकाळजी व  देखभालमशरुम  काढणेवाढविणे व पॅकेजींग प्रकियारोगकिडनिदान व उपचारखाद्य पदार्थ व अर्थशास्त्रबाजारपेठ पाहणी तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनाउद्योजकीय व्यक्तीमत्व विकासयशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शन इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतीनी त्वरीत दिनांक 9 सप्टेंबर पर्यंत  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र उद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208, बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं. 940307877307172-274416), कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं.9011667717),लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment