Search This Blog

Tuesday 8 September 2020

तांत्रिक क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन वेबिनार


 तांत्रिक क्षेत्रातील करिअर संदर्भात मार्गदर्शन वेबिनार

जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूर दि.8 सप्टेंबर: विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या तांत्रिक क्षेत्रातील रोजगाराच्या संधी याबाबत ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन दिनांक 17 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावाअसे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त भैय्याजी येरमे यांनी केले आहे.

तांत्रिक क्षेत्रातील करिअर कॉन्सिलिंग या विषयावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शन औद्योगिक  प्रशिक्षण संस्था चंद्रपूरचे प्राचार्य श्री. नखाते यांचे असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होण्याकरिता मोबाईलवर गुगल मिट ॲप व गुगल साइटवर http://meet.google.com/opf-ymhx-pof या लिंक वर जाऊन सहभागी होता येणार आहे. अधिक माहितीकरीता जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र चंद्रपूर या कार्यालयाचे दूरध्वनी क्र.07172-252294 वर संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment