Search This Blog

Tuesday 15 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6309

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 6309

24 तासात 251 बाधिताची नोंद सहा बाधितांचा मृत्यू

3538 कोरोनातून बरे 2687 वर उपचार सुरू

 

चंद्रपूर दि. 15 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात 251 नवीन बाधितांची नोंद झाली असून कोरोना पॉझिटिव्हची एकूण संख्या 6 हजार 309 झाली आहे. यापैकी 3 हजार 538 बाधित बरे झाले आहेत तर 2 हजार 687 जण उपचार घेत आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारगेल्या 24 तासात 6 बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये दुर्गा माता मंदिर परिसरजटपुरा गेट चंद्रपूर येथील 82 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला पहाटे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू आरटीओ ऑफिस परिसरचंद्रपूर येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा झालाआहे. या बाधिताला 2 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू कन्हाळगाव ब्रह्मपुरी येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू घुटकाळा वार्ड चंद्रपूर येथील 50 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. 10 सप्टेंबरला बाधितेला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 14 सप्टेंबरला बाधितेचा उपचारादरम्यान शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे मृत्यू झाला आहे. या बाधितेला कोरोनासह न्युमोनिया होता.

पाचवा मृत्यू भानापेठचंद्रपूर येथील 69 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाउच्च रक्तदाब, मधुमेह आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तरसहावा मृत्यू गांधी वार्ड,  ब्रह्मपुरी येथील 52 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. याबाधिताला 12 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 84 बाधितांचा मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 77तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 101कोरपना तालुक्यातील 1गोंडपिपरी तालुक्यातील 7चिमूर तालुक्यातील 8नागभीड तालुक्यातील 4पोंभुर्णा तालुक्यातील 9बल्लारपूर तालुक्यातील 18ब्रह्मपुरी तालुक्यातील 28भद्रावती तालुक्यातील 6मूल तालुक्यातील 7राजुरा तालुक्यातील 9वरोरा तालुक्यातील 15सावली तालुक्यातील 20सिंदेवाही तालुक्यातील 14वणी -यवतमाळ  2लाखांदूर-भंडारा व वडसा-गडचिरोली येथील प्रत्येकी एक असे एकूण 251 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील घुटकाळा वार्डसुमित्रा नगरपठाणपुरा वार्डदडमल वार्डबाबुपेठ वार्डऊर्जानगरकोतवाली वार्डरामनगर परिसरपत्रकार नगरएकोरी वार्डनगीना बागवाघोबा चौक तुकुममहाकाली कॉलनी परिसरसंकल्प कॉलनी परिसरआंबेडकर वार्डसिद्धार्थ नगर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

राजुरा तालुक्यातील धोपटाळाचुनाळारामनगर कॉलनी परिसरभारत चौक परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. बल्लारपूर तालुक्यातील गोरक्षण वार्डरवींद्र नगरबुद्ध नगरपंडित दीनदयाल वार्डविद्यानगरविवेकानंद वार्डभगतसिंग वार्डनेहरू नगर भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातून गुजरी वार्डबालाजी वार्डविद्यानगरजानी वार्डकृष्णा कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील सुभाष वार्डविनायक लेआउट परिसरमाढेळीबोर्डाएकार्जूना परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील इंदिरानगर शंकरपूरमाणिक नगरसोनेगावखडसंगीभागातून बाधित पुढे आले आहे. गोंडपिपरी तालुक्यातील भंगाराम तळोधीधाबाचक घडोली परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment