Search This Blog

Wednesday 9 September 2020

नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदीत सहभागी व्हावे : ना. वडेट्टीवार


नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने जनता संचारबंदीत सहभागी व्हावे : ना. वडेट्टीवार

Ø  चंद्रपूरदुर्गापूरपडोलीउर्जानगर व बल्लारपूर शहरात रविवार पर्यंत जनता संचारबंदी

Ø  जाणून घेऊया! काय सुरूकाय बंद

चंद्रपूरदि. 9 सप्टेंबर:  चंद्रपूर शहर तसेच लगत असणारे दुर्गापूरपडोलीउर्जानगर व बल्लारपूर शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. कोरोनाचा प्रसार आणखी वाढु नयेसंसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी  लोकप्रतिनिधी तसेच व्यापारी असोसिएशनच्या संमतीने 10 सप्टेंबर गुरुवार ते 13 सप्टेंबर रविवार पर्यंत जनता संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. नागरिकांनी या जनता संचारबंदीचे पालन करून स्वयंस्फूर्तीने सहभागी व्हावेअसे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसनइतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

या बाबी सुरू राहतील:

सर्व रुग्णालयऔषधालयकृषी केंद्रशासकीय कार्यालयतसेच एमआयडिसी मधील सर्व आस्थापना सुरु राहतील. दूध वितरणपार्सल सुविधासर्व पेट्रोल पंपवर्तमानपत्रांचे वितरण सुरू राहतील.

या बाबी बंद राहतील:

सर्व किराणाभाजी-फळे दुकानेबाजारपेठेतील इतर दुकाने पूर्णता बंद राहतील. बँका फक्त अंतर्गत कामकाजासाठी सुरू असतील परंतु ग्राहक सेवेसाठी बंद राहतील. त्याचबरोबरचंद्रपूर शहरदुर्गापूरपडोलीउर्जानगर व बल्लारपूर शहरातील सर्व पानठेलेचहा टपऱ्याहातगाड्याफुटपाथवरील सर्व दुकाने बंद राहतील.

00000

No comments:

Post a Comment