Search This Blog

Tuesday 8 September 2020

10 सप्टेंबर पासून ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण

 


10 सप्टेंबर पासून ऑनलाईन उद्योजकता विकास प्रशिक्षण

युवक-युवतींनी सहभागी होण्याचे आवाहन

चंद्रपूर,दि.8 सप्टेबर: महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केंद्रचंद्रपूरद्वारे  10 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतींकरीता 10 ते 22 सप्टेंबर या कालवधीमध्ये ऑनलाइन उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

             सदर कार्यशाळेत ऑनलाईन बिझनेस संधीआयाडियाउद्योजकता व उद्योजकाचे गुणलघु उद्योग उभारणीविविध उद्योग संधी मार्गदर्शनसेवा उद्योग व लेदर इंडस्ट्रीजशेतीवर आधारीत उद्योगपशुसंवर्धन इत्यादी उद्योगातील संधीउद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षणसंभाषण कौशल्यसंकलन व आकलन कौशल्यसर्जनशीलतानाविन्यपूर्तता व समस्या निराकरणसंघटनाचे प्रकारशासकीय कार्यालयातील विविध योजनाबाजारपेठ पाहणीसाधने व तंत्रज्ञानउत्पादन निवडउद्योगासाठी लागणारे परवाने नाहकरत प्रमाणपत्र व नोंदणीजीएसटी नोंदणीउद्योगाचे व्यवस्थापनविपणन व्यवस्थापनउत्पादन व कच्चा माल यांचे व्यवस्थापनउत्पादन नियंत्रण व नियोजनआर्थिक व्यवस्थापनप्रकल्प अहवालडिजीटल मार्केटिंगऑनलाईन कर्ज प्रक्रीया व कृती आराखडा तयार करुन अंमलबजावणी करणे इत्यादी विषयावर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात ऑनलाइन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतींनी त्वरीत दिनांक सप्टेंबर पर्यंत महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्रउद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं.9403078773, 07172-274416) व कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे (मो.नं.9011667717) यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment