Search This Blog

Saturday 26 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 9350


 

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 9350

24 तासात 439 बाधिताची नोंद सात बाधितांचा मृत्यू

5362 कोरोनातून बरे ;3846 वर उपचार सुरू

चंद्रपूरदि.26 सप्टेंबर: आरोग्य यंत्रणेकडून प्राप्त माहितीनुसारजिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्याने 439 बाधितांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या आता 9 हजार 350 वर पोहोचली आहे.यापैकी 5 हजार 362 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3 हजार 846 बाधितांवर उपचार सुरू आहे.

जिल्ह्यात  24 तासात सात बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्येदादमहलचंद्रपूर येथील 84 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू गणपती वार्डभद्रावती येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 22 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू तुकुम,चंद्रपुर येथील 58 वर्षीय पुरुष बाधिताचा  झाला आहे. या बाधिताला 19 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

चवथा मृत्यू जगन्नाथ बाबा नगरचंद्रपूर येथील 71 वर्षीय पुरूष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 23 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

पाचवा मृत्यू बीएड कॉलेज परिसरचंद्रपुर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

सहावा मृत्यू इंदिरानगर चंद्रपुर येथील 54 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 24 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरसातवा मृत्यू गडचिरोली येथील 64 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. या सर्व मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह न्युमोनिया आजार असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 142 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 134तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 205 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील दोनबल्लारपूर तालुक्यातील 30चिमूर तालुक्यातील 6, मुल तालुक्यातील 40गोंडपिपरी तालुक्यातील 7कोरपना तालुक्यातील 15ब्रह्मपुरी तालुक्यातील 49नागभीड तालुक्यातील 7,  वरोरा तालुक्यातील 12, भद्रावती तालुक्यातील 27सावली तालुक्यातील तीन,  सिंदेवाही तालुक्यातील 9राजुरा तालुक्यातील 22यवतमाळ येथील तीन तर गडचिरोली येथील दोन असे एकूण 439 बाधित पुढे आले आहे.

 

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील विश्वकर्मा नगररेल्वे नगर वार्डजगन्नाथ नगरसाई बाबा वार्डअंचलेश्वर वॉर्डविद्यानगरनगीना बागअशोक नगरलक्ष्मी नगरशक्ती नगर दुर्गापुरइंदिरानगर घुग्घुसशिवाजीनगरबापट नगरआयुष्य नगर,ऊर्जानगरपठाणपुरा वॉर्डठक्कर कॉलनी परिसरगगनगिरी नगर दाताळाचिचपल्लीसरकार नगरवडगावगंज वॉर्डमाता नगर चौक परिसरभिवापुर वॉर्ड भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील श्रीराम वॉर्डझाकीर हुसेन वार्डसिद्धार्थ वॉर्डबालाजी वार्डराजेंद्रप्रसाद वॉर्डदूधोली बामणीशिवनगर वार्डफुलसिंग नाईक वार्डगोकुळ नगर,गणपती वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील गांधी वार्डनेताजी वार्ड परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

मुल तालुक्यातील हळदीचिमढासुशी दाबगावनांदगाव परिसरातून बाधीत ठरले आहे. राजुरा तालुक्यातील कामगार नगररामपूरसास्तीसोनिया नगरसोमनाथपूरधोपटाळाविवेकानंद नगरलक्कडकोट भागातून बाधीत पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील चिनोराहनुमान वार्डअभ्यांकर वार्डसुभाष वॉर्ड परिसरातून बाधित ठरले आहे. नागभीड तालुक्यातील मौशीविद्यानगरसमर्थ मोहल्ला परिसर भागातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील भवानी वार्डशांतीनगरगांधिनगरशेष नगर ,फुलेनगर ,मेंढकीसावरगावनांदगावसंत रविदास चौकगजानन नागरीलुंबिनी नगरपेठ वार्डजानी वॉर्ड परिसरातून बाधित ठरले आहे.

कोरपना तालुक्यातील गडचांदूरनारंडाकन्यका मंदिर परिसररामनगर कॉलनी परिसरबीबीहनुमान मंदिर वार्डआवारपूर भागातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील गौतम नगरगजानन नगरस्नेहल नगरघोडपेठविश्वकर्मा नगरपांडव वार्डगौराळाआंबेडकर वार्डपरिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील  जनकापूरव्याहाड,भागातून बाधित ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment