Search This Blog

Tuesday, 29 September 2020

भरघोस उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपिकाची लागवड करावी: कृषी विभागाचे आवाहन


 

भरघोस उत्पादनासाठी रब्बी पिकातील आंतरपिकाची लागवड करावी: कृषी विभागाचे आवाहन

चंद्रपूर दि.29 सप्टेंबर:  जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा,गहूलाखोळी,रब्बी ज्वारी ही मुख्य पिके असून काही प्रमाणात जवसमूगउडीद ही पिके घेतली जातात. या पिकाच्या उत्पादनाची ग्राहकांकडून मागणी असल्याने व या मधून उत्पन्न मिळत असल्याने शेतकऱ्यांनी या पिकांची रब्बी हंगामात लागवड करावीअसे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी रब्बी हंगामात 93 हजार 77 हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली होती. यावर्षी रब्बी हंगामात 1 लक्ष 1 हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आलेले आहे.

जिल्ह्यात रब्बी हंगामात जवसकरडईमोहरीरब्बी तीळ या पिकाचे क्षेत्र जरी कमी असले तरी या पिकाचा लागवडी खर्च कमी व उत्पादनातून चांगला भाव मिळत असतो. जवसकरडईमोहरीरब्बी तीळ या पिकाच्या लागवडीसाठी तांत्रिक मार्गदर्शन कृषी विभागाचे क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांचे मार्फत करण्यात येईल.

00000

No comments:

Post a Comment