Search This Blog

Wednesday 30 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242

 


चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या 10242

6047 बाधित कोरोनातून  झाले बरे;

उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4043

24 तासात आणखी 233 बाधिततीन बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 30 सप्टेंबर : जिल्ह्यामध्ये 24 तासात आणखी 233 कोरोना बाधितांची नोंद झाली असून जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 10 हजार 242 वर पोहोचली आहे. सध्या उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या 4 हजार 43 असून आतापर्यंत 6 हजार 47 बाधित कोरोनातून बरे झाले आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसारजिल्ह्यात 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्येसरकार नगरचंद्रपुर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 27 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू मंजुषा लेआउट परिसरभद्रावती येथील 61 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 25 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.

तरतिसरा मृत्यू राजुरा येथील 72 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 28 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  अनुक्रमे पहिल्या बाधिताला कोरोनासह मधुमेहदुसऱ्या बाधिताला कोरोनासह मधुमेह व उच्च रक्तदाब तर तिसऱ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने या तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 152 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 143, तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली तीनयवतमाळ तीन तर भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 117, पोंभूर्णा तालुक्यातील तीनबल्लारपूर तालुक्यातील 13, चिमूर तालुक्यातील14, मुल तालुक्यातील नऊगोंडपिपरी तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील चारब्रह्मपुरी तालुक्यातील 20,  नागभीड तालुक्‍यातील चारवरोरा तालुक्यातील पाच,भद्रावती तालुक्यातील 18, सावली तालुक्यातील चार,  सिंदेवाही तालुक्यातील नऊराजुरा तालुक्यातील आठगडचिरोली येथील दोन तर भंडारा व वडसा येथील प्रत्येकी एक असे एकूण 233  बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील बापट नगरनगीना बागदुर्गापुरऊर्जानगरवडगावइंदिरानगरशास्त्रीनगरमहाकाली वार्डनिर्माण नगर तुकुमबालाजी वार्ड,शिवाजीनगरलुंबिनी नगरबाबुपेठभिवापुर वॉर्डहरिओम नगरबंगाली कॅम्प परिसररयतवारीजल नगरजटपुरा गेट परिसरएकोरी वार्ड भागातून बाधित ठरले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील बिटीएस प्लॉट परिसरझाकीर हुसेन वार्डबामणीविद्या नगर वार्डबालाजी वार्डमहाराणा प्रताप वार्डविसापूरमानोरामहात्मा गांधी वार्ड,राणी लक्ष्मी वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

राजुरा तालुक्यातील रामनगर कॉलनी परिसरपंचशील वार्डविवेकानंदनगरजवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.वरोरा तालुक्यातील इंद्रप्रस्थ नगर,कर्मवीर वार्डसिद्धार्थ वार्डयेन्सादत्त मंदिर वार्डमालवीय वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील विद्यानगरपेठ वार्डफुलेनगरकिन्हीटिळक नगररानबोथलीशिवाजीनगरसौंदरीगणेश वार्डगजानन नगर परिसरातून बाधित ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील सूर्य मंदिर वार्डगुरु नगरलुंबिनी नगरभंगाराम वार्डएकता नगरनवीन सुमठाणासावरकर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. सावली तालुक्यातील पेठगावव्याहाड भागातून बाधित ठरले आहे.

नागभीड तालुक्यातील सावरगावमुसाभाई नगरमेंढा परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

चिमूर तालुक्यातील भिसीविहीरगावजांभुळ घाटवडाळाआझाद वार्डगुरुदेव वार्ड भागातून बाधित पुढे आले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूरकुकुडबोडी,शांती कॉलनी नांदा फाटा भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

1 comment:

  1. मुल तालुक्याची माहिती का लपविता...?

    ReplyDelete