Search This Blog

Wednesday 30 September 2020

मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला



 मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांना दिलेला शब्द पाळला

नागपूर विभागातील पूरग्रस्तांसाठी 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर : मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची वचनपूर्ती

Ø चंद्रपूर जिल्ह्यासाठी 38 कोटी

Ø गडचिरोली जिल्ह्यासाठी 24 कोटी

Ø गोंदिया जिल्ह्यासाठी 12 कोटी

Ø भंडारा जिल्ह्यासाठी 43 कोटी

Ø नागपूर जिल्ह्यासाठी 45 कोटी रुपये

चंद्रपुरदि.30 सप्टेंबर : नागपूर विभागातील जिल्ह्यांमध्ये 30-31 ऑगस्ट तसेच 1 सप्टेंबर 2020 रोजी पुरस्थिती निर्माण झाली होती. या पुरिस्थितीमुळे सामान्य जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत होऊन मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तरी, नैसर्गिक आपत्तीमध्ये बाधित झालेल्या नागरिकांना विविध बाबींसाठी वाढीव दराने मदत देण्यासाठी मंत्रिमंडळाच्या मान्यतेने शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून मदत व पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या पुढाकाराने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी व राज्य शासनाच्या निधीमधून नागपूर विभागातील पूरग्रस्त जिल्ह्यासाठी 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.अशाप्रकारे पुरग्रस्थांना भरीव मदत करून मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी वचनपूर्ती केली आहे.

मध्य प्रदेशातील संजय सरोवर प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदीखुर्द प्रकल्पातील सर्व दरवाज्यांमधून 5 मीटर पर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे भंडारागडचिरोलीचंद्रपूर व नागपूर या जिल्ह्यात 1995 साली ओढावलेल्या पूरापेक्षाही मोठ्या प्रमाणात पूरपरिस्थिती निर्माण होऊन अनेक गावांत,शेतामध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचेशेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले. या दाहक व भीषण परिस्थितीची माहिती मिळताच राज्याचे मदत व पुनर्वसनआपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी करून  नागरिकांसोबत थेट संवाद साधण्यासाठी नियोजित सर्व दौरे रद्द करून तातडीने चंद्रपूर,गडचिरोलीभंडारा व नागपूर जिल्ह्याचा दौरा केला. या चारही जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना श्री.वडेट्टीवार यांनी पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरकार पुरग्रस्तांच्या पाठीशी असल्याचे आश्वासन दिले होते. दौऱ्यादरम्यान मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरेउपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी दुरध्वनीव्दारे चर्चा करून पुरग्रस्तांना तातडीच्या मदतीची विनंती केली होती. या अनुषंगाने आजच महसूल व वन विभागाने निधी मंजूरीचा शासन निर्णय निर्गमीत केला.

नागपूर विभागातील 6 जिल्ह्यातील मत्स्य बोटी व जाळ्यांसाठी तसेच मत्स्यबीज शेतीसाठी सहाय्य व मदतमृत व जखमी व्यक्तींच्या कुटुंबीयांना मदत तसेच नैसर्गिक आपत्तीमध्ये पूर्णता: घराची क्षती झाली असल्यास कपडेभांडी व घरगुती वस्तूंकरीताशेतपिकांच्या नुकसानमृत जनावरव घराची अंशता: पडझड झालेली कच्ची किंवा पक्की घरंनष्ट झालेल्या झोपड्या आणि गोठ्याचे नुकसानकारागीरबारबलुतेदारदुकानदार व टपरी धारकांना मदतजमिनीतील वाळूचिकन माती क्षार काढून टाकण्यासाठी शेतकऱ्यांना सहाय्य तसेच नदीच्या रूपांतरामुळे झालेले जमिनीच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सहाय्यमोफत केरोसीन वाटपासाठी सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी एकूण 162 कोटी 81 लाख 7 हजारचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी  45 कोटी 17 लाख  79 हजारवर्धा 69 लाखभंडारा 42 कोटी 43 लाख 53 हजारगोंदिया 12 कोटी 32 लाख 40 हजारचंद्रपूर 37 कोटी 81 लाख 6 हजार व गडचिरोली जिल्ह्यासाठी 24 कोटी 37 लाख 29 हजार  रूपये निधी मंजूर झाला आहे. नागपूर दौऱ्यावर असतांना दिलेला शब्द श्री. वडेट्टीवार यांनी शासन निर्णय निर्गमित करून पूर्ण केला आहे.

00000

No comments:

Post a Comment