Search This Blog

Saturday 5 September 2020

जिल्हातील घुग्घुस येथे नगर परिषद स्थापनेबाबत उद्घोषणेवरील आक्षेप 30 दिवसाच्या आत सादर करावे

 जिल्हातील घुग्घुस येथे नगर परिषद स्थापनेबाबत

उद्घोषणेवरील आक्षेप 30 दिवसाच्या आत सादर करावे

चंद्रपूर दि. 5 सप्टेंबर : महाराष्ट्र शासन उद्घोषणा क्रमांक एमयुएन-2020, प्र.क्र.175, नवि-18 दिनांक 31 ऑगस्ट 2020 अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदानगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 (1965 चा महा.40) याच्या कलमचे पोट-कलम (3) यांच्या तरतुदीनुसारचंद्रपूर जिल्ह्यातील घुग्घुस या ग्रामपंचायतीचे स्थानिक क्षेत्रलहान नागरी क्षेत्र म्हणून विनिर्दिष्ट करण्यासाठी आणि उक्त क्षेत्रासाठी घुग्घुस नगरपरिषद या नावाने नगरपरिषद गठीत करण्याच्या दृष्टीनेप्राथमिक उद्घोषणा प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

उक्त उद्घोषणेला आक्षेप घेणाऱ्या कोणत्याही व्यक्तीनेही उद्घोषणा महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून 30 दिवसांच्या कालावधीत जिल्हाधिकारीचंद्रपूर यांच्याकडे त्यांची लेखी कारणे सादर करणे आवश्यक असेल. उक्त कालावधीमध्ये मिळालेल्या अशा कोणत्याही आक्षेपावर शासनाकडून विचार करण्यात येईल अशी माहिती एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे  जिल्हा प्रशासन अधिकारीनगर विकास शाखा विजय सरनाईक यांनी  दिली आहे.

00000

No comments:

Post a Comment