Search This Blog

Thursday, 3 September 2020

जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी 6 सप्टेंबर पर्यंत बंद


जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरणासाठी 6 सप्टेंबर पर्यंत बंद

चंद्रपुर,दि. 3 सप्टेंबर: जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. अशातच जिल्हा परिषद चंद्रपूर मुख्यालयातील तीन कर्मचारी कोरोना संक्रमित आढळून आले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव इतर अन्य कर्मचाऱ्यांना होणार नाही. यासाठी जिल्हा परिषद मुख्यालय निर्जंतुकीकरण करण्याकरिता 4 ते 6 सप्टेंबर पर्यंत बंद राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी दिली आहे.

जिल्हा परिषद मुख्यालयातील कामकाज बंद राहणार असल्याने नागरिकांनी त्यांचे कामकाजास्तव संबंधित विभागास ई-मेलद्वारे संपर्क साधावाअसे आवाहन करण्यात आले आहे.

00000


No comments:

Post a Comment