Search This Blog

Wednesday 16 September 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 3690 बाधित कोरोनातून झाले बरे


 

जिल्ह्यात आतापर्यंत 3690 बाधित कोरोनातून झाले बरे

उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 2903

जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 6682 वर

24 तासात 373 नवीन बाधितपाच बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 16 सप्टेंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 373 नवीन बाधितांची भर पडली असून बाधितांची एकूण संख्या 6 हजार 682 वर गेली आहे. आतापर्यंत 3 हजार 690 बाधित कोरोनातून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 2 हजार 903 बाधितांवर उपचार सुरू आहे.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासात पाच बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितांमध्ये बंगाली कॅम्पचंद्रपूर येथील 70 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

दुसरा मृत्यू महाराणा प्रताप वार्डबल्लारपूर येथील 46 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 14 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तिसरा मृत्यू क्राइस्ट हॉस्पिटल परिसरचंद्रपूर येथील 65 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 8 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

चवथा मृत्यू टीचर कॉलनी परिसरचिमूर येथील 45 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 13 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह न्युमोनियाउच्च रक्तदाबमधुमेह आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

तरपाचवा मृत्यू नवीन एसटी वर्कशॉप परिसरतुकुम चंद्रपूर येथील 55 वर्षीय पुरुष बाधिताचा मृत्यू झाला आहे. या बाधिताला 10 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.  कोरोनासह  न्युमोनियाचा आजार असल्याने 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 89 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 82तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन,यवतमाळ तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 239कोरपना तालुक्यातील 18गोंडपिपरी तालुक्यातील 5चिमूर तालुक्यातील 23जिवती तालुक्यातील 1नागभीड तालुक्यातील 2पोंभुर्णा तालुक्यातील 1बल्लारपूर तालुक्यातील 23ब्रह्मपुरी तालुक्यातील 4भद्रावती तालुक्यातील 14मूल तालुक्यातील 8राजुरा तालुक्यातील 10वरोरा तालुक्यातील 12सिंदेवाही तालुक्यातील 1सावली तालुक्यातील 10, गडचिरोली व नागपूर जिल्ह्यातील प्रत्येकी एक असे एकूण 373 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील भिवापूर वार्डरयतवारी कॉलनीरामनगरघुटकाळा वार्डऊर्जानगरसंजय नगरजलनगर वार्डबालाजी वार्डएसटी वर्कशॉप परिसरबापट नगरदवा बाजार परिसरश्रीराम चौकएकोरी वार्डसुमित्रा नगरसिंधी कॉलनी परिसरभटाळीछोटा बाजार परिसरभाना पेठ वार्डहरिराम नगरगोकुल वार्डघुटकाळा वार्डनगीना बागबापट नगर वडगावसमता चौक बाबुपेठद्वारका नगरी तुकुमज्योती नगर या परिसरातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

राजुरा तालुक्यातील विवेकानंद नगरसास्ती कॉलनी परिसरचुनाभट्टी वार्डदोहेवाडीबामणवाडा परिसरातून बाधित ठरले आहे. वरोरा तालुक्यातील माढेळीबोर्डा,रेल्वे कॉलनी परिसरआशीर्वाद वार्डआझाद वार्डचौरशिया वार्डसाई नगरभागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील झाडे प्लॉट परिसरमाजरीगुरु नगरपाटील नगरशिवाजीनगरसुमठाणागांधी चौक परिसरातून बाधित पुढे आले आहे.

बल्लारपूर तालुक्यातील विद्या नगर वार्डदादाभाई नौरोजी वार्डआंबेडकर वार्डगणपती वार्डनांदगाव पोडेबामणीगांधी चौक परिसरमहाराणा प्रताप वार्डरेल्वे वार्डसरकार नगरटिळक वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.चिमूर तालुक्यातील गुरुदेव वार्डमुरपारशंकरपुरभासुलीमाणिक नगर वडाळाबंदर कॉलनी परिसरातून बाधित पुढे आले आहे.

00000

No comments:

Post a Comment