Search This Blog

Saturday 5 September 2020

पशुधनावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम

 पशुधनावर आधारीत प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 5 सप्टेंबर : महाराष्ट्र  उद्योजकता  विकास केन्द्रचंद्रपूरद्वारे  7 वी  पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता चंद्रपुर येथे दिनांक 15 ते 25 सप्टेंबर असे दोन आठवडे कालावधीचे पशुधनावर आधारित शेळी पालनदुग्ध  व्यवसाय  व  कुक्कुट  पालन  प्रशिक्षण  कार्यक्रम आयोजित  करण्यात आले आहे.

प्रशिक्षणामध्ये शेडची रचनाव्यवसायाचे फायदेशेळी,  गाय  व कोंबड्यांची  विविध जातीपैदासनिवडप्रजनन,  औषधोपचार,लसीकरणनिगा व संरक्षण प्रतीबंधक उपाय त्याचे संगोपन व व्यवस्थापनसंतुलीत आहार जिवनसत्वाचे महत्व,संसर्गजन्य रोग व त्यावर उपचार तसेच शासनाच्या विविध अनुदानित योजनाउद्योजकीय व्यक्तीमत्व विकासयशस्वी उद्योजक यांचे मार्गदर्शनकर्ज प्रकरण तयार करण्याचे मार्गदर्शनपशुधन विकास कार्यालयाच्या योजना व व्यवसाय संधी इत्यादी विषयांवर विशेष तज्ञ व शासकिय अधिकारी वर्गाद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

सदर प्रशिक्षणात प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक-युवतीनी त्वरीत दिनांक 14 सप्टेंबर पर्यंत  महाराष्ट्र उद्योजकता विकास केन्द्र उद्योग भवनदुसरा माळागाळा क्र. 208बस स्टॉप समोररेल्वे स्टेशन रोडचंद्रपुर येथे स्वत:चा बायोडाटाशाळा सोडल्याचा दाखलागुणपत्रिकाआधार कार्ड व दोन पासपोर्ट साईज फोटो घेवून हजर रहावे.

अधिक माहितीसाठी प्रकल्प अधिकारी के.व्ही.राठोड (मो.नं. 9403078773. 07172-274416) तसेच कार्यक्रम आयोजक लक्ष्मी खोब्रागडे (मो.नं. 9309574045) यांच्याशी संपर्क साधावा.

000000

No comments:

Post a Comment