Search This Blog

Tuesday 8 September 2020

अशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी अल्पसंख्यांक कल्याण समिती सदस्य नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करावे

 अशासकीय स्वयंसेवी संस्थेच्या प्रतिनिधींनी

अल्पसंख्यांक कल्याण समिती सदस्य नियुक्तीसाठी प्रस्ताव सादर करावे

जिल्हा प्रशासनाचे आवाहन

चंद्रपूर दि.8 सप्टेंबर: जिल्ह्यातील अल्पसंख्याकांसाठी काम करणाऱ्या तीन नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांचा सदर समितीवर सदस्य म्हणून नियुक्तीसाठी शासनास शिफारशी सादर करावयाचे आहे. तरी इच्छुक नामवंत अशासकीय स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी यांनी अर्जप्रस्ताव जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या नावाने सात दिवसाच्या आत जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर गव्हाड यांनी केले आहे.

अल्पसंख्यांक विकास विभाग मंत्रालय मुंबई यांच्या शासन निर्णयाच्या निर्देशानुसार अल्पसंख्यांक कार्य मंत्रालयभारत सरकार यांच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार पंतप्रधान यांच्या नवीन 15 कलमी कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी नव्याने जिल्हास्तरीय अल्पसंख्याक कल्याण समितीची पुनर्रचना करण्यात आली आहे.

00000

No comments:

Post a Comment