Search This Blog

Wednesday 9 September 2020

कोरोना विषयक माहिती व अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची भूमिका महत्वपूर्ण: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने



 कोरोना विषयक माहिती व अडचणी सोडविण्यासाठी नियंत्रण कक्षाची भूमिका महत्वपूर्ण: जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हाधिकाऱ्यांनी केली कोरोना नियंत्रण कक्षाची पाहणी

चंद्रपूरदि. 9 सप्टेंबर: कोरोना संदर्भात नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच आवश्यक माहिती उपलब्ध व्हावी यासाठी नियंत्रण कक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. कोरोना नियंत्रण कक्षाची पाहणी तसेच नियंत्रण कक्षामार्फत सुरू असलेले कामकाजाबाबत त्यांनी आढावा  घेतला.

यावेळीअतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकरजिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोतजिल्हा शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोडआपत्ती व्यवस्थापन अधिकारी जितेश सुरवाडे उपस्थित होते.

जिल्ह्यातील कोरोनाच्या संदर्भात माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी तसेच उपाययोजना कार्यान्वित करण्यासाठी स्वतंत्र कोरोना नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यात येणारी आपत्तीजनक परिस्थितीबाबत सतर्कते विषयीची माहिती नागरिकांपर्यंत तात्काळ पोहोचविता येईल असे नियोजन करावे. अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात. त्याचबरोबरकोणत्याही आपत्तीला सामोरे जाण्यासाठी समन्वय साधून कामे पूर्ण करावीत असेही ते म्हणाले.

कोरोना नियंत्रण कक्षामध्ये कक्ष असून विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी 24 तास सेवा देत आहेत. जिल्हा आरोग्य अलगीकरण पथकजिल्हा कोरोना अहवाल व नोंदवह्या पथककोरोना प्रतिबंधात्मक कार्यवाही कृतीदलसंपर्क संवाद व आकस्मिक उपाययोजना व मदत पथक आदी प्रकारची पथके कार्यान्वित आहेत.

00000

No comments:

Post a Comment