Search This Blog

Tuesday 29 September 2020

जाणुन घेऊया ! हवामानावर आधारीत कृषी सल्ला

 

जाणुन घेऊया ! हवामानावर आधारीत कृषी सल्ला

चंद्रपूर दि. 29 सप्टेंबर: अतिवृष्टीगारपीटढगाळ हवामान आदी संकटांमुळे पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव आढळून येत असतो. हवामान बदलामुळे शेती व्यवसायापुढे विविध आव्हाने निर्माण होत असतात. गावपातळीवरील शेतकऱ्यांपर्यंत वेळेवर हवामान सल्ला पोचविणे गरजेचे असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानावर आधारीत कृषि सल्ल्याच्या आधारावर पिकाचे योग्य ते व्यवस्थापन करावे असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

असा आहे हवामानावर आधारित कृषी सल्ला:

धान लोंबी येण्याची अवस्था:

लवकर येणाऱ्या धान पिक वाणांची भेसळ लोंबी (लांबोर) काढून टाकावे.लवकर येणाऱ्या कालावधीच्या धानामध्ये लोंबी येण्याच्या सुरूवातीस 25 टक्के (54 किलो) युरिया प्रति हेक्टरी द्यावे व पोटरी अवस्थेत 10 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.मध्यम ते उशिरा कालावधीच्या धानाचे निंदणी करून उरलेल्या 50 टक्के नत्राच्या मात्रेपैकी अर्धी मात्रा 25 टक्के (54 किलो) युरिया प्रति हेक्टरी दयावे. तसे  2.5 ते 5 सेंमी पाण्याची पातळी ठेवावी.

ढगाळ वातावरण व वाढत्या आद्रतेमुळे तपकीरी तुडतुडे यांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तरी धान पिकात प्रति चुड 5 ते 10 तपकीरी तुडतुडे यांचा नियंत्रणासाठी मेटाराहयझियम अनीसोपली ही जैविक 2.50 किलो प्रति हेक्टरी या प्रमाणात दयावीत.

खोडकिडीचे 5 टक्के किडग्रस्त फुटवे दिसताच क्वीनॉलफॉस 32 मिली किंवा ट्रायझोफॉस 25 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.लष्करी अळीचा प्रादुर्भावावर पाळत ठेवण्यासाठी सायंकाळी अर्धा तास प्रकाश सापळे लावावेत व या सापळयात पतंग आढळल्यास कृषि तज्ञास सूचित करावे.

पाने गुंडाळणारी अळीबेरडसुरळीतील अळी व शिंगे अळी यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोफॉस 40 टक्के प्रवाही 25 मि.ली. किंवा क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रवाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.करपा रोगाचा नियंत्रणासाठी  कार्बेन्डाझीम 50 टक्के डब्ल्युपी 10 ग्रॅम किंवा मेन्कोझेब 75 टक्के प्रवाही 30 ग्रॅम किंवा हेक्झाकोनॅझोल 5 टक्के ई.सी.20 मि.ली. यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

कडाकरपा रोगाचा नियंत्रणासाठी कॉपर हायड्रोक्साईड 53.8 टक्के डीएफ 30 ग्रम किंवा स्टेपटोमायसीन सल्फेट 90 टक्के + टेट्रासायक्लीन हायड्रोक्लोराईड 10 टक्के एसपी हे संयुक्त जीवाणू नाशक 1.5 ग्रम प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

सोयाबीन-फांद्या येणाची अवस्था:

तंबाखूची पाने खाणारी व हिरवी उंट अळ्यांचास्पोडोप्टेराचा प्रादुर्भाव आढळल्यास त्यांच्या प्रादुर्भावानुसार नियंत्रणासाठी इंडोक्व्सीकार्ब 15.8 टक्के एस.सी. 7 मि.ली. किंवा ट्रायझोफोस 40 टक्के 12.5 मि.ली किंवा ईथीआन 50 टक्के 15 ते 30 मि.ली लिटर पाण्यातून फवारावे.

पक्षांना बसण्यासाठी शेतात हेक्टरी 15 ते 20 पक्षी थांबे लावावेत म्हणजे त्यावर बसणारे पक्षी शेतातील अळया टिपून खातील.ढगाळ वातावरणामुळे पानावरील जीवाणु व बुरशीजन्य ठिपके आढळल्यास टेबूकोनाझोल 10 टक्के डब्लू.पी.+ सल्फर 65 टक्के डब्लू.जी. 25 ग्रम 10 लिटर पाण्यातून फवारावे.लवकर येणारी वाण (जेएस 95-60, जेएस 20-34, जेएस 93-5) परीपक्क्व झाले असल्यासशेंगा फुटण्याअगोदर कोरडे वातावरण पाहून पिक कापून घ्यावे.

कापूस-फुले व बोंडे अवस्था:

पीक फुलावर असतांना 2 टक्के युरिया़ची (200 ग्रॅम युरिया + 10 लिटर पाणी) आणि बोंडे भरण्याच्या अवस्थेत 2 टक्के डिएपी (200 ग्रॅम डिएपी +10 लिटर पाणी) ची फवारणी करावी. ढगाळ वातावरणामुळे रसशोषक किडीच्या नियंत्रणासाठी फिप्रोनिल 5 टक्के प्रवाही 30 मि.ली. किंवा बुफ्रोफेजीन 25 टक्के 20 मि.ली. किंवा प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे.

शेंदरी बोडअळीच्या निरीक्षणासाठी प्रति हेक्टरी 8 कामगंध सापळे लावावेत.या सापळ्यामधील अडकलेल्या नरपतंग वेळोवेळी काढून नष्ट करावे तसेच दर 21 दिवसानंतर वडया  (ल्युर) बदलत राहावे.कपाशीला प्रादुर्भाव ग्रस्त डोमकल्या आढळल्यास दर आठवडयांनी अळीसहित वेचून नष्ट कराव्या.5 टक्के प्रादुर्भाव दिसल्यास प्रोफेनाफॉस 50 टक्के प्रवाही 20 मिली किंवा क्वीनॉलफॉस 25 टक्के एएफ 25 मि.ली. क्लोरोपायरीफॉस 20 टक्के प्रावाही 25 मि.ली. प्रती 10 लिटर पाण्यातून फवारावे.

तूर फांद्या येण्याची अवस्था:

तुर पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी.  तसेच रोगग्रस्त फांदया काढून टाकावे.

तीळ- फांद्या अवस्था:

धान बांधीच्या धुऱ्यावर तीळ पिकातील तणांच्या नियंत्रण करण्यासाठी एक किंवा दोनदा निंदणी करून घ्यावी.

हळद- कंद वाढीची अवस्था:

पानावरील ठिपके आढळताच कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. खोडमाशीचा नियंत्रणासाठी रोगग्रस्त पाने काढून जाळून टाकावे व निंबोळी अर्क टक्के प्रति 10 लिटर पाण्यातून फवारावे. रासायनिक तणनाशक व किटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहूनच करावी. फवारणी करताना संरक्षक किटचा वापर करावा.

00000

No comments:

Post a Comment