Search This Blog

Wednesday 16 September 2020

एक ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार

 एक ऑक्टोंबर पासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील सफारी सुरू होणार

ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळावर उपलब्ध

चंद्रपूरदि. 16 सप्टेंबर: ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील निसर्ग पर्यटन (सफारी) दिनांक 1 ऑक्टोंबर पासून नियमितपणे सुरु करण्यात येत आहे.या पर्यटनाची सुरुवात राज्य सरकार व राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण यांचे दिशानिर्देशानुसार सुरू होणार असल्याची माहिती एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक डॉ.जितेंद्र रामगावकर यांनी दिली आहे.

या उपाययोजना असणार बंधनकारक :

एका ओपन जिप्सी वाहनात 1 वाहनचालक, 1 मार्गदर्शक व 4 पर्यटक एवढ्याच व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. 10 वर्षाखालील व 65 वर्षावरील व्यक्तींना तसेच गर्भवती स्त्रियांना पर्यटनासाठी प्रवेश दिला जाणार नाही.

प्रवेशद्वारावर सोशल डिस्टन्सिंग पाळणे आवश्यक राहील. प्रवेशद्वारातून पर्यटकास प्रवेश देण्यापूर्वी सर्व पर्यटकजिप्सी चालकमार्गदर्शक यांचे शरीराचे तापमान हे थर्मर स्क्रिनींगईन्फ्रारेड थर्मामीटरने तपासण्यात येईल. हे सर्वसाधारण असल्यासच प्रवेश देण्यात यावा. ताप-सर्दी-खोकला असलेल्याआजारी असलेल्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. तसेच अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची माहिती नजीकच्या कोविड रुग्णालयात दिली जाईल.

प्रत्येकानी चेहऱ्यावर मास्क लावणे आवश्यक राहील व सोबत रुमाल ठेवणे आवश्यक राहीलमास्क शिवाय प्रवेशद्वारातून प्रवेश दिल्या जाणार नाही. कोणत्याही परिस्थितीत वापरलेला मास्कहातमोजेफेस शिल्डपाण्याच्या बाटल्या इत्यादी साहित्य वनक्षेत्रात अथवा अन्यत्र फेकले जाणार नाहीयाची दक्षता घेण्यात येईल.

पर्यटन वाहनात बसण्यापूर्वी सर्वांनी सॅनिटायजरने हात निर्जंतुक करणे बांधनकारक असेल. त्याशिवाय कोणालाही जिप्सीमध्ये बसू दिले जाणार नाहीप्रवेश दिला जाणार नाही. प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीधारकांनी त्यांच्या जिप्सीमध्ये बसणाऱ्यांसाठी सॅनिटायजर ठेवणे बंधनकारक राहील. तसेच जिप्सीधारकांनी जिप्सीची प्रवेशद्वारावर येण्यापूर्वी जिप्सीची साफसफाई व सॅनिटाईज करणे आवश्यक राहील.

पर्यटकांसाठी स्वच्छतागृहे स्वच्छ ठेवण्यात येतील.प्रत्येक वापरानंतर स्वच्छतागृहे निर्जुंतीकरण करण्यात येईल.पर्यटन प्रवेशद्वारावर जिप्सीचे टायर निर्जंतुक (टायर बाथ) करण्याची सुविधा असणार असून तसे करणे बंधनकारक राहील.

या व्याघ प्रकल्पात पर्यटनासाठी येणाऱ्या सर्वांसाठी व्याघ्र प्रकल्पाचेराज्य शासनकेंद्रशासन,  स्थानिक प्रशासनाच्या नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

ऑनलाईन आरक्षण संकेतस्थळावर उपलब्ध:

पर्यटकांकरीता ऑनलाईन आरक्षणाची सुविधा www.mytadoba.org संकेतस्थळावर दिनांक 16 सप्टेंबर 2020 पासून उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे. यामध्ये बफर क्षेत्रातील विविध ऍक्टिव्हिटीचे आरक्षण सुद्धा पर्यटकांना ऑनलाईन प्रणालीद्वारे करता येणार आहे. विविध पर्यटन शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. पर्यटनाबाबत अधिक माहिती करीता 07172-277116 व  7588063463 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करण्याची व्यवस्था दिनांक 16 सप्टेंबर पासून करण्यात आली आहे.

000000

No comments:

Post a Comment