Search This Blog

Tuesday 22 September 2020

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4754 बाधितांना डिस्चार्ज


 

चंद्रपूर जिल्ह्यातील आतापर्यत 4754 बाधितांना डिस्चार्ज

बाधितांची एकूण संख्या 8289;

उपचार सुरु असणारे बाधित 3413

जिल्ह्यात 24 तासात 199 बाधितचार बाधितांचा मृत्यू

चंद्रपूरदि. 22 सप्टेंबर : चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 24 तासात आणखी 199 बाधित पुढे आले आहेत. त्यामुळे कोरोना बाधितांची एकूण संख्या 8 हजार 289 झाली आहे. यापैकी 4 हजार 754 कोरोना बाधितांना आतापर्यंत बरे झाल्यामुळे सुटी देण्यात आली असून 3 हजार 413 कोरोना बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार24 तासांमध्ये चार कोरोना बाधितांचा मृत्यू झालेला आहे. यामध्येसरकार नगर चंद्रपूर येथील 89 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 6 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.

दुसरा मृत्यू बाबुपेठचंद्रपुर येथील 67 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 17 सप्टेंबरला क्राइस्ट हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले होते.

तिसरा मृत्यू बालाजी वार्डचंद्रपुर येथील 68 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 18 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. 

तरचवथा मृत्यू गांधी वार्डबल्लारपूर येथील 62 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 15 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. अनुक्रमे एक ते दोन मृत्यू झालेल्या बाधितांना कोरोनासह मधुमेह आजार असल्याने क्राईस्ट हॉस्पिटल चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे. तर तिसऱ्या व चवथ्या बाधिताला कोरोनासह न्युमोनिया असल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपूर येथे मृत्यू झालेला आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत 122 कोरोना बाधितांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. यापैकीचंद्रपूर 115तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली दोन आणि यवतमाळ येथील तीन बाधितांचा समावेश आहे.

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परीसरातील 96 बाधितपोंभूर्णा तालुक्यातील चारबल्लारपूर तालुक्यातील 28चिमूर तालुक्यातील तीन, मूल तालुक्यातील तीनगोंडपिपरी तालुक्यातील दोनकोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 7नागभीड तालुक्यातील 10वरोरा तालुक्यातील 18भद्रावती तालुक्यातील 6सावली तालुक्यातील दोनसिंदेवाही तालुक्यातील 9राजुरा तालुक्यातील 10 असे एकूण 199 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील संजय नगरशंकर नगरसरकार नगरदुर्गापुरइंदिरानगरबाबूपेठनगीना बागरामनगरविठ्ठल मंदिर वार्डजल नगर वार्डबंगाली कॅम्प परिसरदादमहल वार्डघुटकाळा वार्डख्रिश्चन कॉलनी परिसरअंचलेश्वर वॉर्डएकोरी वार्डनेताजी चौक परिसरशिवाजी नगरगोपाल नगर तुकुमभवानी माता मंदिर परिसररयतवारी कॉलनी परिसर भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील कन्नमवार वार्डगोकुळ नगरगणपती वार्डबुद्ध नगरडब्ल्यूसीएल कॉलनी परिसरबालाजी वार्डमहाराणा प्रताप वार्डपरिसरातून बाधित पुढे आले आहे.सिंदेवाही तालुक्यातील जामसाळाअष्टविनायक नगरमहेश नगर भागातून बाधित ठरले आहे.

ब्रह्मपुरी तालुक्यातील शिवाजी नगर खेडविद्यानगरशेष नगरपटेल नगरसंत रवीदास चौकबोरमाळाभागातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.भद्रावती तालुक्यातील घोडपेठमाजरी कॉलरी परिसरसुरक्षा नगर भागातून बाधीत ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment