Search This Blog

Saturday 5 September 2020

रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधीविषयी ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार

 रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधीविषयी ऑनलाईन मार्गदर्शन वेबिनार

जिल्ह्यातील युवक-युवतींनी लाभ घेण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 5 सप्टेबर: जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध व्हावे यासाठी प्रत्यक्षपणे संपर्क होऊ शकत नाही. त्याकरिता विविध क्षेत्रात उपलब्ध असलेल्या रोजगार व स्वंयरोजगाराच्या संधी तसेच स्पर्धा  परीक्षेविषयी ऑनलाईन मार्गदर्शन वेबीनारचे आयोजन 14 व 15 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त युवक-युवतींनी लाभ घ्यावाअसे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री वाघमारे यांनी  केले आहे.

यांचे असणार मार्गदर्शन:

रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी या विषयावर मार्गदर्शन 14 सप्टेबर रोजी दुपारी 12 ते 1.30 वाजता औद्योगिक प्रशिक्षण संस्था बल्लारपूरचे प्राचार्य अमर जाधव यांचे असणार आहे.

तसेचस्पर्धा परीक्षेविषयी 15 सप्टेंबर रोजी 12 ते 1.30 वाजता कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी उस्मानाबादचे संजय गुरव मार्गदर्शन करणार आहेत.

असे होता येणार सहभागी:

मोबाईलवर meet.google.com/kik-wuuz-swb&meet.google.com/yie-kfhu-yej या लिंकवर जावून 14 व 15 सप्टेंबर रोजी सहभागी होता येणार आहे.

00000

No comments:

Post a Comment