Search This Blog

Friday, 4 September 2020

एचआयव्ही सह जगणाऱ्या वंचित वर्गास सामाजिक लाभ देण्यासाठी प्रतिबद्ध : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने



 एचआव्ही सह जगणाऱ्या वंचित वर्गास सामाजिक

लाभ देण्यासाठी प्रतिबद्ध : जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची सभा

चंद्रपूरदि.4 सप्टेंबर : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी प्रशासनिक पाठबळ देण्यात येईल.त्याचबरोबर एचआयव्ही सह जगणाऱ्या वंचित वर्गास सामाजिक लाभ देण्यासाठी प्रतिबध्द असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. जिल्हा एड्स नियंत्रण समितीची सभा जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.

यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी प्रकाश साठे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, वरिष्ठ वैद्यकिय अधिकारी एआरटी केंद्र सामान्य रूग्णालय डॉ. दिलीप मडावी, जिल्हा आयसीटीसी पर्यवेक्षक निरंजन मंगरुळकर, जिल्हा सहाय्यक लेखा जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण पथक नसीमा शेख अनवर व अशासकिय संस्थाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी यांचे निर्देशान्वये राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा घेण्यात आला. त्यात चंद्रपुर जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकिय वैद्यकिय महाविद्यालय पर्यंत एचआव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा पुरविण्यात येत आहे. मागील वर्षी 90 हजार एव्ही चाचणी करण्यात आल्यात 411 सामान्य संक्रमित आढळल्या. त्या सर्वांना उपचारावर घेण्यात आले. त्याप्रमाणे 51 हजार 938 गरोदर माताची एचआव्ही चाचणी करण्यात आली. त्यात 40 माता संक्रमित आढळल्यात त्या सर्वांना उपचारावर घेण्यात आले.

एप्रिल ते जून 2020 पर्यंत 37 हजार एचआव्ही चाचण्या करण्यात आल्या. त्यात अनुक्रमे सामान्य संक्रमित 53 व गरोदर माता 8 आढळून आल्या. या सर्वाना उपचारावर घेण्यात आले. त्याच प्रमाणे एआरटी उपचार घेत असलेल्या लाभार्थ्यांचा सुद्धा आढावा जिल्हाधिकारी यांनी घेतला. विशेष करुन वंचित वर्गास न्याय देण्यास प्रतिबद्ध होते. टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना शासकिय योजनाचा लाभ देण्यासाठी शिबीरांचे आयोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिले. व त्यांचे सर्व शासन मान्य मागणीचा विचार करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

महिला व बालविकास विभागास प्रक्रियेत असलेले सर्व अर्ज तात्काळ कार्यवाही करुन त्यांना लाभ देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातर्फे जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी सादरीकरण केले.या सभेत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी नारायण गाडगे, प्रतिनिधी डिसीपीयु सचिद्र नाईक, प्रकल्प समन्वयक विहान संगिता देवाळकर, प्रकल्प व्यवस्थापक जनहिताय मंडळ गोपाल पोर्लावार, प्रकल्प संचालक संबोधन ट्रस्ट राज कचोले, लिंक वर्कर प्रकल्प रोशन आकुलवार, प्रकल्प व्यवस्थापक ट्रेकर्स नोबल शिक्षण संस्था अनिल उईके,  प्रकल्प व्यवस्थापक स्थलांतरीत नोबल शिक्षण संस्था डॉ. पवन मार्कंडावार, उपस्थित होते.

000000

No comments:

Post a Comment