Search This Blog

Friday 18 September 2020

शेतीवर आधारीत ऑनलाईन उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम



 शेतीवर आधारीत ऑनलाईन उद्योग प्रशिक्षण कार्यक्रम

चंद्रपूर,दि. 18 सप्टेंबर: महाराष्ट्र उद्योजकता  विकास केंद्रचंद्रपूरद्वारे  10 वी पास  व 18 वर्षे पूर्ण असलेल्या युवक-युवतीकरीता ऑनलाईन 29 सप्टेबर ते 10 ऑक्टोबर 2020 या  कालावधीमध्ये ऑनलाईन शेतीवर आधारीत उद्योगप्रशिक्षण  कार्यक्रम आयोजित  करण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेत ऑनलाईन शेतीवर आधारीत विविध उद्योगसंधी, अन्न प्रक्रियावर आधारीत उद्योगसंधी डिजीटल मार्केटिंग, ॲग्रीकल्चर प्रॉडक्ट पॅकेजिंगदुग्ध व्यवसाय व दुग्ध प्रक्रिया उद्योगातील उद्योगसंधीफळ प्रक्रियातील उद्योगसंधीपशुसंवर्धवर आधारीत उद्योगसंधी, उद्योजकता व उद्योजकीय प्रेरणा प्रशिक्षण, संभाषण कौशल्यसंकलण व आकलन कौशल्यसर्जनशीलतानाविन्यपूर्तता व समस्या निराकारण इत्यादी विषयांवर ऑनलाईनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

या प्रशिक्षणात ऑनलाईन प्रवेश घेण्याकरीता इच्छुक युवक- युवतीनी www.mced.co.in या वेबसाईटवर 28 सप्टेबर  पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा. अधिक माहितीसाठी  प्रकल्प अधिकारी के व्ही. राठोड  (मो.नं. 9403078773, 07172-274416)कार्यक्रम आयोजक मिलिंद कुंभारे  (मो.नं. 9011667717 )  यांच्याशी संपर्क साधावा.

00000

No comments:

Post a Comment